News Flash

हत्येचा आरोप असलेल्याची जमावाकडून पोलिसांच्या समोरच हत्या

आरोपीनं केली होती शिक्षकाची हत्या

प्रातिनिधीक छायाचित्र

उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यात एका शिक्षकाची हत्या करून पलायन करणाऱ्या एका व्यक्तीची जमावाकडूनच हत्या करण्यात आली. आरोपी पोलिसांकडे प्रत्यार्पण करणार होता. परंतु त्यापूर्वीच जमावानं त्याला पकडून त्याची हत्या केली. जमावाकडून आरोपीला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये त्या आरोपीचा मृत्यू झाला. दरम्यान, आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेच्या वेळी त्या ठिकाणी पोलीसदेखील उपस्थित होते.

रामपुरमध्ये राहणार सुधीर सिंह हे शिक्षण म्हणून एका शाळेत कार्यरत होते. सोमवारी आपल्या घरी असताना रात्री ८ वाजता एक व्यक्ती त्यांच्या घरात शिरली. त्या व्यक्तीनं सिंह यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर घराच्या छतावर चढून त्या व्यक्तीनं हवेतही गोळीबार केला.

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यापूर्वीच जमावानं त्या आरोपीला पकडलं. पोलिसांना पाहिल्यानंतर आरोपीनं प्रत्यार्पण करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वी जमावानं त्या व्यक्तीला मारहाण सुरू केली. यामध्ये त्या आरोपीचा मृत्यू झाला. गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर बऱ्याच वेळानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचं सांगण्यात आलं. तोपर्यंत स्थानिकांनी त्या व्यक्तीला घेरत मारहाण करण्यास सुरूवात केली. ही घटना सुरू असताना पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांसमोरच ही घटना घडल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 8:26 am

Web Title: angry mob lynches murder accused in presence of up police personnel jud 87
Next Stories
1 भारत-चीन वाद : ‘अरुणाचल प्रदेशला आम्ही कधी मान्यताच दिली नाही, तो तर दक्षिण तिबेटचा भाग’; चीनचा दावा
2 लडाखमध्ये भारत-चीनच्या जवानांमध्ये पुन्हा संघर्ष?; भारतानं गोळीबार केल्याचा पीएलएचा आरोप
3 करोनानंतर जगभर राष्ट्रवादाची लाट!
Just Now!
X