भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या कार्यपध्दतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
‘आज (शुक्रवार) दुपारी तुम्ही भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीबाबत मला माहिती देण्यासाठी आलात, त्यावेळेस मी माझ्या नाराजीबाबत आणि तुमच्या कार्यपध्दतीबाबत माझी निराशा झाल्याचे तुम्हाला बोललो होतो, असे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.’
भाजपचे ‘नमो’ नम:! नरेंद्र मोदीच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार
संसदीय मंडळाच्या बैठकीला गैरहजर असलेले अडवाणी म्हणाले कि, ‘मी बैठकीला उपस्थित न राहणेच योग्य होईल’, असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले  आहे.
मी माझे विचार संसदीय  मंडळाच्या इतर सदस्यांसमोर मांडावेत कि नाही, याबाबतही मी विचार करेन असंही तुम्हाला सांगितले होते. आता मी संसदीय मंडळाच्या बैठकिला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी आपल्या छोटेखानी पत्रात लिहिले आहे.
आगामी मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अडवाणी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध केला होता.    
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही मान्यता असलेल्या मोदी यांच्या नावाच्या घोषणेबाबत अडवाणींची मनधरणी करण्यात भाजपला अपयशच आल्याचे दिसत आहे. 

व्हिडिओ : भाजप कार्यकर्त्यांचा मुंबईत जल्लोष