23 November 2019

News Flash

अनिल अंबानी इंडोनेशियातील कोळसा खाणही विकणार

हा व्यवहार पूर्ण झाल्यास रिलायन्स समुहाला 150 ते 200 दशलक्ष डॉलर्स मिळण्याची शक्यता आहे.

(संग्रहित छायाचित्र)

कर्जाच्या कचाट्यात सापडलेल्या अनिल अंबानी यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या व्यवसायांची विक्री करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, रिलायन्स पॉवरने इंडोनेशियातील आपली कोळसा खाण विकण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, पुढील काही महिन्यांमध्ये हा व्यवहार पूर्ण होणार आहे.

जर हा व्यवहार पूर्ण झाला तर अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहाला 150 ते 200 दशलक्ष डॉलर्स मिळण्याची शक्यता असल्याची माहिती या व्यवसायाची माहिती असलेल्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. बिझनेस स्टॅन्डर्डने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. कोळसा खाण विक्रीची सध्या प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ज्यांना या खरेदीत रस आहे अशा कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. परंतु रिलायन्स पॉवरच्या प्रवक्त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच चीनच्या इंडस्ट्रीयल आणि कमर्शिअल बँक ऑफ चायना, एक्झिम बँक ऑफ चायना आणि चायना डेव्हलपमेंट बँकेने रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडला 15 हजार कोटी रूपयांचे कर्ज फेडण्यास सांगितले होते. दरम्यान, एकेकाळी जगातील निवडक श्रीमंतामध्ये असलेले अनिल अंबानी आता या यादीतून बाहेर गेले आहेत. तसेच अनिल अंबानी यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 5 हजार 400 कोटी रूपये राहिले आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांच्या सहा कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 8 हजार कोटींपेक्षा अधिक होते.

First Published on June 25, 2019 6:39 pm

Web Title: anil ambani reliance power started process to sell coal mines in indonesia jud 87
Just Now!
X