अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने टेलिकॉम साहित्य बनवणारी दिग्गज स्वीडिश कंपनी एरिक्सनला त्यांची ४६२ रुपयांची थकबाकी अदा केली आहे. एरिक्सननेच याची माहिती दिली आहे. मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने अनिल अंबानी यांच्या आरकॉम आणि त्यांच्या दोन संचालकांना ४ आठवड्याच्या आत एरिक्सनची थकबाकी द्यावी किंवा न्यायालयाच्या अवमाननेप्रकरणी तीन महिन्यांचा कारावास भोगावा असे म्हटले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील महिन्यात २० फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने अनिल अंबानी यांना जाणूनबुजून आदेशाचे उल्लंघन करणे आणि एरिक्सनची थकबाकी न देता न्यायालयाचा अवमान केल्याचे सिद्ध झाले होते. तत्पूर्वी, एरिक्सनने न्यायालयात आपली बाजू मांडताना अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाकडे राफेल व्यवहारात गुंतवणूक करण्यासाठी पैसे आहेत. पण थकबाकी देण्यास पैसे नाही, असा आरोप केला होता. तर अंबानी यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली होती. मोठे भाऊ मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओबरोबरील व्यवहार अयशस्वी ठरल्यानंतर त्यांची कंपनी दिवाळखोर घोषित करण्यासाठी कार्यवाही सुरु केल्याचे म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil ambanis rcom pays 462 crore rupees to sweden ericsson to evade punishment of prison
First published on: 18-03-2019 at 19:36 IST