18 January 2018

News Flash

राजकीय पक्षांच्या अस्तित्वालाच अण्णा हजारे यांचे थेट आव्हान

राजकीय पक्षांना मान्यता देणारा १९५१चा लोकप्रतिनिधी कायदाच घटनाबाह्य असल्याचा दावा करून त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारीही त्यांनी सुरू केल्याचे समजते.

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली | Updated: October 4, 2017 6:45 AM

अण्णा हजारे ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

लोकप्रतिनिधी कायदा घटनाबाह्य असल्याचा दावा

लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध सत्याग्रह करण्याचा इशारा दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजकीय पक्षांच्या थेट अस्तित्वालाच आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय पक्षांना मान्यता देणारा १९५१चा लोकप्रतिनिधी कायदाच घटनाबाह्य असल्याचा दावा करून त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारीही त्यांनी सुरू केल्याचे समजते.

‘निवडणूक लढविण्यासाठी राजकीय पक्षांना चिन्हे कशाला हवीत? राज्यघटनेतील ८४व्या कलमामध्ये निवडणुकीसंदर्भातील नियम आणि पात्रता दिल्या आहेत. पण त्यामध्ये राजकीय पक्षांची स्थापना किंवा त्यांच्यासाठी चिन्हे आरक्षित करण्याबाबत काहीही नमूद केलेले नाही. त्याचा गैरफायदा घेऊन पक्षांच्या नावावर अनेक भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक निवडून येत आहेत. म्हणून चिन्हेच रद्दबातल करण्याची मागणी माझी आहे. यापूर्वी मी निवडणूक आयोगाला पत्रे लिहिलीत; पण त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. आता मात्र सर्वोच्च न्यायालयातच १९५१च्या लोकप्रतिनिधी कायद्यला आव्हान देण्याचा विचार आहे,’ असे हजारे यांनी मंगळवारी दिल्लीतील ‘नव्या महाराष्ट्र सदना’मध्ये जमलेल्या आपल्या कार्यकर्त्यांंशी बोलताना सांगितले.

आपली भूमिका पुढे मांडताना ते म्हणाले,’राजकीय पक्षांसाठी चिन्ह ही ओळख आहे. पण त्याच्या नावाखाली काही लोकांचे समूह झालेत. त्यातून भ्रष्टाचार आणि गुंडगिरी वाढलीय. म्हणून ते रद्दबातल केले पाहिजेत. चिन्हे रद्द केल्याने मतदारांमध्ये कोणताही गोंधळ राहणार नाही. याउलट ते पक्षाऐवजी उमेदवाराकडे पाहून मतदान करतील. पक्ष ही व्यवस्थाच हळूहळू संपेल आणि देश चांगला चालेल. पण ही लढाई सोपी नाही. मोठा संघर्ष करावा लागेल. गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवायला लागतील.’

राज्यघटनेतील ३२४ व्या कलमान्वये, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद आणि राज्य विधिमंडळांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. राजकीय पक्ष असा सुस्पष्ट शब्द राज्यघटनेमध्येही कोठेही नमूद नसल्याचा दावा अण्णांच्या काही समर्थकांकडून केला जात असला तरी संसदीय लोकशाहीचा मात्र उल्लेख आहे.

First Published on October 4, 2017 3:25 am

Web Title: anna hazare challenges to political parties representation of the people act
 1. K
  Kamlakar
  Oct 4, 2017 at 11:04 am
  अण्णा हजारेंजी तुम्ही. आता वयोवृद्ध झाला आहेत , दुसऱ्याला आवाहन देण्या पेक्षा थोडं शांत राहा उतावीळपणा अंगास. येईल .
  Reply
  1. Shriram Bapat
   Oct 4, 2017 at 10:37 am
   भाजपच्या दृष्टीने अण्णांनी उपस्थित केलेला मुद्दा एकदम ी. आता भाजप अण्णांना सर्व कुमक उपलब्ध करून देईल. अण्णांना सुद्धा लाइफटाइम इशू मिळाला. अण्णांनी शंभरी गाठली तरी भारतीय न्यायालये त्यांना लौकर निर्णय देऊन दगा देणार नाहीत. नखे असलेले लोकपाल विधेयक २० फूट खोल जमिनीत ले जाईल. नाहीतरी काल ५ वाजता टीव्हीवर होणाऱ्या चर्चेत लोकपाल मुद्द्यावर लढा पुढे नेण्याची बौद्धिक कुवत अण्णांमध्ये नाही असा अँकरसकट सर्वानी निष्कर्ष काढला होता ( भाजप प्रवक्ता सोडून) बापाला चिरंजीवांनी 'तुम्हाला मुले कशी पैदा करावी हे समजत नाही' सुनावण्यासारखे होते ते.
   Reply
   1. Anil Gudhekar
    Oct 4, 2017 at 7:38 am
    राजकीय पक्ष हे तत्वनिष्ठ / मुल्याधीवर/विचारावर आधारलेली हवीत ...अस्तित्वात असलेल्या पेक्षा जर वेगळ्या तत्व/विचारधारेचा पक्ष स्थापन करावयाचा असेल तरच त्यास मंजुरी द्यावी ..व्यक्तिनिष्ठ पक्षांना अजिबात मंजुरी देऊ नये शिवाय पक्ष स्थापन करण्या आदी त्यास किमान ५ लोकांचा त्यास पाठिंबा आहे हे सिद्ध करण्याची शर्थ असावी ....व त्यांची सुरवात हि गावपातळी वरून करण्यात यावी तसेच पक्ष स्थापने नंतर किमान २ वर्षांनी त्यांना निवडणूक लढविण्याची शर्थ घालावी ... ५० हुन कमी मतदान झाले तर तेथील निवडणूक रद्द करावी व विजयी उमेदवाराला ऐकून मतदानाच्या ५० च्यावर मते मिळण्याची शर्थ असावी .......राजकीय पक्षांना आपल्याकडील बहुसंख्या जनता अशिक्षित आहे म्हणून चिन्ह दिले जाते तेव्हा आता जर बहुसंख्या जनता शिक्षितअसेल तर चिन्ह पद्धत बंद करावी ......ह्यावर अण्णांनी भर द्यावा व खरोखरीची लोकशाही आपल्या देशात आणण्याचे श्रेय घ्यावे
    Reply
    1. L
     laxmi
     Oct 4, 2017 at 7:25 am
     अण्णा हजारे किती शिकलेले आहेत?त्यांची माहिती मिलटरी मध्ये एक ड्राइव्हरची आहे मग हे घटना कशे काय समजतात ,मोठं मोठेया विद्वानांनाही नीट समजत नाही ,मग ते स्वतः वाचून समजून घेतात का ,लोक त्यांना सांगून पुढे करून मागे आपली केजरीवालसारखी पोळी शेकून मंत्री बनतात ,त्याची शरद पवार ,ह्यांच्यावर भ्रष्टाचार केला म्हणून ओरड होती पण कोणी कुठे काही केले नाही ,मोदींनीही त्यांना ,गुरु मानले .आपल्या देशात जो चांगले काम करतो तो खलनायक बनतो आणि भ्रष्टाचार करवून १०० पिढ्या पोस्टही एवढे कमावतो तो माणूस ,नेता ऑफीसार ,हिरो होतो आणि लोक त्याची पूजा करतात हो कि नाही मग कशाला अन्न हजारे सारखे लोक टाइम वेस्ट करून आम जनतेला भडकवतात ?आणि नेत्यांना निवडून आणण्यास मदत करत आहेत नाहीतर रॉड छाप केजरीवाल मुख्यमंत्री झाला नास्ता.
     Reply
     1. P
      Prakash Sarjerao
      Oct 4, 2017 at 7:25 am
      महात्मा गांधींनीच स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेच सांगितलं होतं कि पक्ष स्थापन करायचे नाहीत म्हणून. त्याच हेतूने त्यांनी काँग्रेस पार्टी बंद करायचे सुचवले होते. आता तर सर्वच पक्ष एकसारखे वागायला लागलेत. भाजप तर असा दावा करायला लागलाय कि गुंड जर त्यांच्या पक्षात आले तर ते सुधारतात! हि परिस्थिती आहे आज.
      Reply
      1. Load More Comments