News Flash

‘अतुल्य भारता’च्या जाहिरातीत नेपाळचे दर्शन !

पोलंडमधल्या भारतीय दूतावासाला मागावी लागली माफी

भारतातील जैवविविधतेने नटलेले निसर्ग सौंदर्य आणि जागतिक वारशाचा दर्जा लाभलेली शेकडो स्थळे आहेत, जगासमोर भारताचे हे अतुलनीय सौंदर्य यावे, येथील पर्यटन व्यवस्थेला चालना मिळावी यासाठी ‘अतुल्य भारत’ सारखे कँम्पेन राबवले जात आहे, पण हे कँम्पेन महागात पडू शकते याची कल्पनाही आली नसेल. ‘स्वातंत्र्य दिना’दिवशी पोलंडमधल्या भारतीय दूतावासाबाहेर ‘अतुल्य भारत’ चे मोठे पोस्टर लावले होते. पण याच पोस्टरवरून पोलंडमधले भारतीय दूतावास अडचणीत आले. या पोस्टरमध्ये दाखवलेली निसर्गसौंदर्यांने नटलेली पर्वतरांग ही भारतामधील नसून ती नेपाळमधील असल्याचे एका नेपाळी रहिवाशांनी दाखवून दिले. मूळचे नेपाळचे रहिवासी असलेले राजेश श्रेष्ठा या व्यक्तीने ‘अतुल्य भारत’ चे हे पोस्टर हे भारतात नव्हे तर नेपाळमध्ये चित्रित केले असल्याचे ट्विट केले. बर्फाच्छदित पर्वतरांगेत एक तरूणी योग करते आहे आणि त्यावर ‘अतुल्य भारत’ असे लिहलेली जाहिरात भारतीय दूतावासाने केली परंतु ही पर्वतरांग अन्नपूर्णा पर्वतरांग असून ती भारतात नाही तर नेपाळमध्ये असल्याचे राजेश यांनी दाखवून दिले. तसेच हे आक्षेपार्ह पोस्टर त्यांनी सोशल मीडियावर देखील शेअर केले. त्यांचे ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेक नेपाळी नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकारानंतर पोलंडमधल्या भारतीय दूतावासाला माफी मागण्याची वेळ आली. भारताचे पोलंडमधील दूत अजय बिसारिया यांनी त्वरीत राजेश यांची फेसबुकवर माफी मागीतली. ‘चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, आमच्याकडून अनावधानाने चूक झाली असून हे पोस्टर त्वरीत हटवण्यात आले आहेत. आणि या प्रकारबद्दल संपूर्ण नेपाळी जनतेची आम्ही माफी मागतो’ असेही त्यांनी लिहले. परंतु जगातील दहा जैवविविधतेने नटलेल्या देशात भारताचा समावेश असताना चित्रिकरण करण्यासाठी शेजारच्या देशात का जावे लागले आणि इतकी मोठी चूक कशी काय झाली यावर आता प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 3:31 pm

Web Title: annapurna range in india ambassador says sorry after faux pas by indian embassy in poland
Next Stories
1 औषधांविना उपचारांचा दावा करणाऱ्या सॅबेस्टिअन मार्टिन यांचा मृत्यू
2 केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांच्या पत्नीला ब्लॅकमेल करून दोन कोटींची मागणी
3 देशी दारू प्यायल्यानंतर बिहारमध्ये ११ जणांचा गूढ मृत्यू
Just Now!
X