News Flash

देशात आणखी ५९,११८ जणांना करोनाची लागण

देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने साडेतीन महिन्यांनंतर चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे

(संग्रहित छायाचित्र)

 

देशात गेल्या एका दिवसात आणखी ५९ हजार ११८ जणांना करोनाची लागण झाली असून हा या वर्षीचा (एका दिवसात लागण होण्याचा) उच्चांक आहे. त्यामुळे देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या एका कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ वर पोहोचली असल्याचे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

त्याचप्रमाणे देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने साडेतीन महिन्यांनंतर चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात सलग १६व्या दिवशी उपचाराधीन रुग्णांची संख्या चार लाख २१ हजार ०६६ इतकी झाली आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या ३.५५ टक्के इतके आहे. करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९५.०९ टक्के इतके झाले आहे.

देशात गेल्या २४ तासांत आणखी ५९ हजार ११८ जणांना करोनाची लागण झाली, १८ ऑक्टोबर २०२० नंतरचा हा उच्चांक आहे. करोनामुळे आणखी २५७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या एक लाख ६० हजार ९४९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत एक कोटी १२ लाख ६४ हजार ६३७ जण करोनातून बरे झाले आहेत, तर मृत्युदराचे प्रमाण १.३६ टक्के इतके आहे.

करोनामुळे गेल्या २४ तासांत २५७ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी १११ जण महाराष्ट्रातील आहेत. देशात एकूण एक लाख ६० हजार ९४९ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी ५३ हजार ७९५ जण महाराष्ट्रातील आहेत, असे आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

महाराष्ट्रासह पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड, गुजरातमध्ये करोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत वाढ

महाराष्ट्रासह पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरात या पाच राज्यांमध्ये करोनाची दररोज मोठ्या प्रमाणावर लागण होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने शुक्रवारी सांगण्यात आले. देशात या वर्षी २ फेब्रुवारी रोजी सर्वात कमी म्हणजे ८६३५ जणांना करोनाची लागण झाली होती, तर १२ फेब्रुवारी रोजी उपचाराधीन रुग्णांची संख्या सर्वात कमी म्हणजे एक लाख ३५ हजार ९२६ इतकी होती. आता महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक म्हणजे ३५ हजार ९५२ जणांना करोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये मिळून ७३.६४ टक्के उपचाराधीन रुग्ण आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. महाराष्ट्रासह पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये मिळून करोनाची नव्याने लागण होण्याचे प्रमाण ८० टक्के इतके आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:36 am

Web Title: another 59118 people in the country were infected with coronavirus abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दहशतवादाच्या प्रतिकारासाठी भारत-बांगलादेशाने एकत्र यावे- मोदी
2 शेतकऱ्यांच्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
3 प. बंगाल, आसाममध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान
Just Now!
X