News Flash

करोनावरील आणखी एका औषधाची देशात चाचणी

भारतीय औषध महानियंत्रकांनी सीएसआयआर व लक्साई लाइफ सायन्सेस प्रा. लि. यांना कोलचिसिन या औषधावर चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे.

करोनावरील आणखी एका औषधाची देशात चाचणी

हृदयरोगासह सहव्याधी असलेल्या रुग्णांसाठी वापर शक्य

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय औषध महानियंत्रकांनी सीएसआयआर व लक्साई लाइफ सायन्सेस प्रा. लि. यांना कोलचिसिन या औषधावर चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे. हे औषध कोविड प्रतिबंधासाठी वापरता येऊ शकते.

सीएसआयआरच्या महासंचालकांचे सल्लागार राम विश्वाकर्मा यांनी सांगितले की, हृदयरोग व इतर सहआजार असलेल्या व्यक्तींमध्ये या औषधाचा वापर करता येऊ शकतो. अपायकारक सायटोकिन्सवरही त्याचा उपयोग होऊ शकेल. कोविड असलेल्या रुग्णात उपचारानंतर हृदयविकारात गुंतागुंत निर्माण होते. त्यातून अनेक लोकांचे प्राण गेले होते. त्यामुळे त्यासाठी फेरउद्देशित औषध किंवा नवीन औषधे शोधण्याची नितांत गरज आहे. सीएसआयआर व लक्साई लाइफ सायन्सेस प्रा. लि. यांच्या सहकार्यातून उपरोल्लेखित औषधाच्या चाचण्या घेण्याची परवानगी देण्यात आली. त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील सुरक्षा व परिणामकारकता चाचण्या घेण्यात येतील. कोविड १९ रुग्णांवरील उपचारात वैद्यकीय परिणामकारकता सुधारण्यासाठी हे औषध उपयोगी आहे.

सीएसआयआर समवेत या चाचण्यांत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी हैदराबाद तसेच जम्मूची भारतीय एकात्मिक वैद्यक संस्था सहभागी आहेत.

कोलचिसिन या औषधाचा भारत हा मोठा उत्पादक देश असून जर चाचण्या यशस्वी झाल्या, तर हे औषध किफातयशीर किमतीत रुग्णांना देता येईल, असे आयआयसीटीचे संचालक एस. चंद्रशेखर यांनी सांगितले. लक्साई लाइफ सायन्सेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राम उपाध्याय यांनी सांगितले की, लोकांनी चाचण्यांसाठी नावे नोंदवली असून भारतात अनेक ठिकाणी ८ ते १० आठवड्यांत या चाचण्या करण्यात येणार आहेत. चाचण्यांचे निकाल सकारात्मक आले, तर हे औषध मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करता येईल.

देशात दिवसभरात ८४,३३२ रुग्ण; ४,००२ जणांचा मृत्यू

पीटीआय, नवी दिल्ली

देशात गेल्या २४ तासांत ८४ हजार ३३२ जणांना करोनाची लागण झाली, गेल्या ७० दिवसांतील हा नीचांक आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने शनिवारी सांगण्यात आले.

सध्या देशात करोनाबाधितांची संख्या दोन कोटी ९३ लाख ५९ हजार १५५ इतकी असून गेल्या एका दिवसात ४००२ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या तीन लाख ६७ हजार ०८१ वर पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून सध्या ती संख्या १० लाख ८० हजार ६९० वर पोहोचली आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या ३.६८ टक्के इतके आहे. करोनातून बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा झाली आहे, हे प्रमाण ९५.०७ टक्के इतके आहे.  देशात करोनामुळे आतापर्यंत तीन लाख ६७ हजार ०८१ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2021 2:03 am

Web Title: another drug on corona virus infection tested in the country akp 94
Next Stories
1 ब्रिटनमध्ये ‘डेल्टा’चा प्रादुर्भाव
2 ‘भारत सरकारचे काही निर्णय लोकशाही मूल्यांशी विसंगत’
3 करोनावरील औषधे करमुक्त
Just Now!
X