सीरमच्या ‘कोविशिल्ड’नंतर देशाला आता भारत बायोटेकनं बनवलेली पहिली स्वदेशी लस ‘कोवॅक्सिन’ लवकरच उपलब्ध होणार आहे. कारण केंद्रीय औषधं मानक नियंत्रण संघटनेच्या कोविड -१९ आजारासाठी बनवलेल्या विशेषज्ज्ञांच्या समितीने शनिवारी या लसीच्या आपत्कालिन वापराच्या मंजुरीसाठी शिफारस केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (सीडीएससीओ) विषय तज्ज्ञ समितीने (एसईसी) लसीच्या आपत्कालिन वापराच्या मंजूरीसाठी डीसीजीआयकडे शिफारस केली आहे.

ब्रिटनमधील नव्या विषाणूचा संसर्ग रोखण्यात भारत यशस्वी, आयसोलेशन ठरलं प्रभावी – ICMR

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविडशिल्डला आत्पत्कालिन वापरासाठी शनिवारी संध्याकाळी मंजुरी देण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते. दरम्यान, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या वापरासाठी शिफारस करण्यात आली असली तरी अद्याप याला मंजुरी देण्यात आलेली नाही. याबाबत लवकरच मंजुरीची घोषणाही होण्याची शक्यता आहे.

देशात ‘ड्राय रन’ला सुरुवात, युपीत मकर संक्रांतीपासून लसीकरण

दरम्यान, देशभरात करोना प्रतिबंधक लसीच्या ‘ड्राय रन’ला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातही ‘ड्राय रन’ सुरु झाले असून मकर संक्रांतीपासून या राज्यात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल, असे संकेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.