अमेरिकेत कन्सास येथे एका कारखान्यात बंदूकधाऱ्याने तीनजणांना ठार केले व नंतर पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार केले. या हल्ल्यात इतर १४ जण जखमी झाले आहेत. हार्वी तालुक्याचे नगरपाल टी. वॉल्टन यांनी सांगितले की, हेसटन येथे एक्सेल इंडस्ट्रीज या कंपनीत काम करणाऱ्या एकाने हा हल्ला केला.

वॉल्टन हे पहिल्यांदा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हल्लेखोरावर गोळ्या मारून त्याला जायबंदी केले त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. तेथील स्थिती अतिशय भयानक होती व त्यांच्या विभागाला व्हाइट हाऊसकडून अभिनंदनाचे संदेश आले आहेत. अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराच्या घटना नवीन नाहीत. हल्लेखोराने प्रथम त्याच्या मोटारीतून दोन मोटारसायकलस्वारांवर गोळीबार केला नंतर एक पिकअप ट्रक चोरून त्याने कारखान्याकडे कूच केले. नंतर त्याने पार्किंगमध्ये एका महिलेला रायफलने गोळी मारली नंतर इमारतीत घुसून गोळीबार केला. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार क्लेरिक फोर्ड  असे हल्लेखोराचे नाव आहे.