पश्चिम बंगालमध्ये वर्धमान जिल्ह्य़ात आणखी दोन बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या पाच झाली आहे.
अतुल प्रसाद लेट (४०) या शेतकऱ्याने विष्णुबती खेडय़ात कीटकनाशक खाऊन आत्महत्या केली. बिजॉय हंसदा (३८) या शेतकऱ्याने शिवरामपोर येथे शुक्रवारीआत्महत्या केली. दोघांचाही वर्धमान वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शनिवारी सकाळी मृत्यू झाला. दोन्ही शेतकऱ्यांचे नातेवाईक असे म्हणाले की, त्यांनी कर्ज घेतले होते व बटाटय़ाला ग्राहक नसल्याने त्यांनी आत्महत्या केली.
दरम्यान जमालपूरचे सह गटविकास अधिकारी दीपक घोष यांनी सांगितले की, अतुल याने त्याचे बटाटे शीतगृहात ठेवले होते व त्यातील काही विकले होते. कर्जबाजारीपणा हे आत्महत्येचे कारण आहे का याचा तपास केला जात आहे. जमालपूरचे आमदार उज्ज्वल प्रामाणिक यांनी सांगितले की, अतुल याचा मृत्यू बटाटा उत्पादनाशी संबंधित नाही. त्याने दुसऱ्याच कारणासाठी कर्ज घेतले होते व कुटुंबातील प्रश्नांमुळे त्याने आत्महत्या केली.
एक बटाटाउत्पादक शेतकरी खंदागोष येथे  मरण पावल्याचे पोलिसांनी सांगितले.