22 November 2019

News Flash

अमित शाह म्हणतात टीम इंडियाचा पाकिस्तानवर दुसरा स्ट्राईक निकाल तोच!

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, पियूष गोयल यांनीही दिल्या शुभेच्छा

क्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये रविवारी सर्व जगाचे लक्ष वेधून घेणा-या भारत-पाकिस्तान या पारंपारिक प्रसिस्पर्धी देशांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला ८९ धावांनी हरवल्यानंतर भारताच्या विजयाचा आनंदोत्सव प्रत्येक ठिकाणी साजरा केला जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या खास शैलीत भारताच्या विजयाबद्दल व्टिट केले आहे. त्यांनी भारताने पाकिस्तानवर केलेला हा दुसरा स्ट्राईक होता, जो की टीम इंडियाने केला होता आणि याचा निकालही तोच लागला. उत्कृष्ट खेळाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन, या विजयाबद्दल प्रत्येक भारतीयास अभिमान वाटत आहे व प्रत्येकजण आनंदोत्सव साजरा करत आहे. असे व्टिट मध्ये म्हटले आहे. शहा यांचे व्टिट सोशल मिडीयावर झपाट्याने पसरत आहे.

याशिवाय टीम इंडियाच्या विजयाबद्दल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी व्टिटद्वारे शुभेच्छा दिला आहेत.. शिवाय अनेकांनी आपल्या फेसबुक, व्हाट्स अप, व्टिटरवर या विजयाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. कालच्या विजयाने भारताने पाकिस्तानला विश्वचषकात सलग सातव्यांदा हरवले.

First Published on June 17, 2019 7:53 am

Web Title: another strike on pakistan by team india amit shah msr87
Just Now!
X