परप्रांतियांविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी दाखल असलेल्या खटल्यांप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. परप्रांतिय आणि मुख्यत्वे बिहारी नागरिकांविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी राज यांच्या विरोधात दाखल असलेल्या सर्व खटल्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राज यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत अनेकांनी तक्रारी दाखल केल्या मात्र, यानंतर तक्रारकर्ते गंभीर नसल्याचे दिसून आले. याचिकाकर्ते दिलेल्या तारखेला न्यायालयात हजर राहत नाहीत. या पार्श्वभूमीवर खटल्यांना स्थगिती देण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
२००८ साली राज यांनी आपल्या सभांतून परप्रांतियांवर निशाणा साधत त्यांच्याविरोधात विधाने केली होती. यावर दिल्ली, झारखंड, बिहार या ठिकाणांहून राज यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.