22 October 2020

News Flash

करोनाविरोधी प्रतिपिंड काही रुग्णांत तीन महिने

आयजीजी प्रकारचे हे प्रतिपिंड जास्त काळ टिकल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे

करोना विषाणूच्या विरोधात शरीरात प्रतिपिंड तयार होत असतात. त्यामुळे शरीर त्याला प्रतिकार करू शकते. काही रुग्णांमध्ये कोविड १९ विषाणू विरोधातील प्रतिपिंड तीन महिने टिकून राहिल्याचे दिसून आले आहे. लक्षणे दिसल्यापासून तीन महिन्यांच्या कालावधीत हे प्रतिपिंड लाळ व रक्त यात सापडले. याबाबतचे संशोधन सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून त्यात भारतीय वंशाच्या एका वैज्ञानिकाचाही सहभाग आहे.

आयजीजी प्रकारचे हे प्रतिपिंड जास्त काळ टिकल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. सार्स सीओव्ही २ विषाणूला आपले शरीर कसा प्रतिकार करते त्याचा आढावा घेण्यासाठीही या संशोधनाचा उपयोग होणार आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार रक्त व लाळ यात हे प्रतिपिंड दिसून आले. प्रतिपिंड तपासणीसाठी लाळ हे माध्यमही योग्य आहे असा याचा दुसरा अर्थ आहे. या संशोधनात अनिता अय्यर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ३४३ रुग्णांमध्ये करोना प्रतिपिंडाचे प्रमाण लक्षणे सुरू झाल्यानंतर १२२ दिवसांनी तपासले असता ते जास्त दिसून आले. एकूण १५४८ रुग्णांमध्ये हे प्रमाण तपासण्यात आले होते त्यात या ३४३ रुग्णात प्रमाण जास्त दिसून आले. करोना विषाणूवरील विशिष्ट प्रथिनाला प्रतिकार करणाऱ्या प्रतिपिंडांचाच यात विचार करण्यात आला. आयजीजी, आयजीए व आयजीएम या प्रतिपिंड प्रकारात एकूण संवेदनशीलता अनुक्रमे ९५ टक्के, ९० टक्के व ८१ टक्के दिसून आली. लक्षणे सुरू झाल्यापासून १५ ते २८ आठवडय़ांनी त्यांची संवेदनशीलता तपासण्यात आली. आयजीएम व आयजीए प्रतिपिंड कमी काळ टिकतात व त्यामुळे ४९ व ७१ दिवसांनी त्यांचे प्रमाण फारसे दिसून आले नाही. विशिष्ट प्रथिनाला प्रतिकार करणाऱ्या आयजीजी प्रतिपिंडांचे प्रमाण जास्त दिसून आले. सायन्स नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार आयजीए व आयजीएम प्रतिपिंड हेही संबंधित विषाणूच्या प्रथिनाला प्रतिकार करतात पण ते लगेच नष्ट होण्यास सुरुवात होते. आयजीजी प्रतिपिंड मात्र १०५ दिवस टिकून राहतात, असे ४०२ रुग्णांच्या अभ्यासात दिसून आले. हा अभ्यास टोरांटो विद्यापीठातील बावेलेटा इशो यांनी केलो. लाळ व रक्त यात हे प्रतिपिंड दिसून आले. तीन ते ११५ दिवसांपर्यंतच्या काळात या रुग्णात प्रतिपिंडांची तसापणी झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 12:24 am

Web Title: anti corona antibodies in some patients for three months abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 राज्यसभेच्या ११ जागांसाठी ९ नोव्हेंबरला मतदान
2 डोंगर पोखरून मागणीवाढीचा उंदीर!
3 हाथरस पीडितेच्या मानवाधिकारांचे उल्लंघन
Just Now!
X