12 July 2020

News Flash

आंदोलनादरम्यान इम्रान खान यांच्या गाडीवर गोळीबार

पाकिस्तानातील तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या गाडीवर शुक्रवारी गोळीबार करण्यात आला . मात्र, या हल्ल्यातून इम्रान खान सुरक्षितरित्या बचावले आहेत.

| August 15, 2014 06:39 am

पाकिस्तानातील तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या गाडीवर शुक्रवारी गोळीबार करण्यात आला . मात्र, या हल्ल्यातून इम्रान खान सुरक्षितरित्या बचावले आहेत. शरीफ सरकारच्या राजवटीविरोधात इम्रान खान यांनी आंदोलन पुकारले आहे. निवडणुकीतील गोंधळ आणि सरकार बरखास्तीच्या मागणीसाठी इम्रान खान आणि ताहीर उल काद्री लाहोर यांच्या नेतृत्वाखाली इस्लामाबाद अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. इस्लामाबादच्या दिशेने जाताना इम्रान खान यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये त्यांना दुखापत झाली नसली, तरीही त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. इम्रान खान यांच्या वाहनांच्या ताफ्यावरही यावेळी जोरदार दगडफेक झाली. या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांनी ही घटना घडली त्यावेळी कोणताही हस्तक्षेप केला नाही, असा आरोप इम्रान खान यांचे प्रवक्ते अनिला खान यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2014 6:39 am

Web Title: anti govt protesters march on in pakistan shots fired at imran khan
टॅग Imran Khan,Pakistan
Next Stories
1 स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदींनी केलेले भाषण प्रभावहीन – काँग्रेस
2 धर्माधता लोकशाहीस घातकच!
3 बालहट्ट नामंजूर
Just Now!
X