समाजातील अल्पसंख्यांक समाजाशी उघडपणे जवळीक केल्याने, काँग्रेस पक्षाच्या निधर्मीवादी भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.के. अॅन्टोनी यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाकडून विशिष्ट समुहाला झुकते माप देण्यात येत असल्याचे चित्र सध्या समाजातील विशिष्ट गटांमध्ये तयार झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांना समान न्याय ही काँग्रेस पक्षाची मुख्य भूमिका आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता, ही भूमिका प्रत्यक्षात अंमलात आणली जाते की नाही याबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे समाजात काँग्रेस पक्षाविषयी चुकीचा भ्रम पसरल्याचे ए.के. अॅन्टोनी यांनी सांगितले.