18 January 2018

News Flash

संघ आणि भाजपच्या विरोधात बोलणाऱ्यांना संपवलं जातंय- राहुल गांधी

देशात केवळ एकच आवाज असला पाहिजे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

एएनआय | Updated: September 6, 2017 1:15 PM

Rahul Gandhi : ४ डिसेंबरला राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, राहुल यांच्याविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता.

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर निशाणा साधला. देशामध्ये सध्या संघ आणि भाजपविरोधात बोलणाऱ्यांना संपवलं जातंय, अशी टीका त्यांनी केली. जो कुणी संघाच्या किंवा भाजपच्या विचारसणीचा विरोध करत असेल त्याला धमकावले जाते, मारले जाते, त्याच्यावर हल्ला केला जातो आणि वेळ पडली तर त्या व्यक्तीला ठारही मारतात. या सगळ्यामागे देशात केवळ एकच आवाज असला पाहिजे, हेच उद्दिष्ट आहे. मात्र, ही आपल्या देशाची परंपरा नाही, असे राहुल यांनी म्हटले.

गौरी लंकेश हत्या प्रकरण: बंगळुरू पोलिसांकडून संशयित ताब्यात

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. लोक म्हणतात पंतप्रधान शांत राहतात, कशावरही प्रतिक्रिया देत नाहीत. एखाद्या मुद्द्यावरून दबाव खूपच वाढल्यानंतर पंतप्रधानांना वाटते की, आता आपण काहीतरी बोलायलाच पाहिजे. पंतप्रधान मोदी हे कसलेले हिंदू राजकारणी आहेत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचे दोन अर्थ असतात. एक अर्थ त्यांच्या विचारसरणीच्या लोकांसाठी असतो तर दुसरा अर्थ उर्वरित लोकांसाठी असतो, असे राहुल यांनी सांगितले. दरम्यान, मी गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी बोललो आहे. गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पकडा आणि शिक्षा करा, असे त्यांना सांगितल्याची माहिती राहुल यांनी दिली.

सुप्रसिद्ध पत्रकार आणि बंगळुरू येथील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांची मंगळवारी बंगळुरू येथे हत्या करण्यात आली. त्यांच्या राहत्या घरी अनोळखी हल्लोखोरांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि एम.एम. कलबुर्गी यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याच पद्धतीने गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली असून देशभरातील विचारवंतांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

First Published on September 6, 2017 1:15 pm

Web Title: anybody who speaks against ideology of bjp rss is pressured even killed says rahul gandhi
 1. R
  Ramdas Bhamare
  Oct 15, 2017 at 8:45 am
  या बातमीने भक्तांच्या पार्शवभागाला मिरच्या न झोम्बल्या तरच नवल . राहुल गांधी यांनी सत्यकथन केले आहे . पानसरे , दाभोलकर , कुलबर्गी यांच्या रांगेत अनेक आहेत आणि २०१९ पर्यंन्त त्यांची संख्या वाढू शकते . आरएसएस आणि भाजपचे मुक्त विचारांचा गळा आवळणारे हात जनता छाटल्याशिवाय राहणार नाही . जळजळणारा पार्शवभाग धुण्यासाठी माणसे भाड्याने ठेवावी लागतील .
  Reply
  1. उर्मिला.अशोक.शहा
   Sep 7, 2017 at 6:36 am
   वंदे मातरम-भ्रष्टचारी कोळसा प्रसिद्ध नेत्यांना जनता संपवीत आहे त्याला कोण काय करणार ?आपण शहाजोग होता म्हणून आपली ४४ अशी अवस्था जनतेने केली का?असे बेछूट पुरावा नसलेले आरोप करण्या ने च काँग्रेस ची सत्ता गेली आहे तरी याला अक्कल येत नाही आणि याला पंत प्रधान व्हायचे आहे, जनता जनार्दनाला सर्व माहित आहे जा ग ते र हो
   Reply
   1. R
    ramesh
    Sep 6, 2017 at 5:33 pm
    लोकसत्ता तील आजची एकमेव बातमी जिथे भक्तांच्या प्रतिक्रिया आहेत. बाकी बातम्यात भक्तांना तोंड लपवायला सुद्धा जागा नाही म्हणून पप्पू हे सॉफ्ट टार्गेट केलं. पप्पू हा पप्पूच आहे पण हा पण च आहे.
    Reply
    1. S
     Soniya
     Sep 6, 2017 at 4:49 pm
     भक्तांच्या घरात जेव्हा ही दहशत घुसेल आणि तोंडातून ब्र काढण्याची सोय राहणार नाही तेव्हा त्यांना कळेल कि देश कुठे चालला आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत काय असते. पण तोपर्यंत उशीर झालेला असेल. आता जे काय आहे ते बोलून घ्या. तुम्हाला वापरून न दिले जाणार आहे बहुजनांनो.
     Reply
     1. S
      Soniya
      Sep 6, 2017 at 4:50 pm
      phekun dile janar ahe
      Reply
     2. Viren Narkar
      Sep 6, 2017 at 3:14 pm
      Raaj Thackeray had described Pappu perfectly. He said .. "BJP will be alive till Rahul Gandhi is there" The most person in India.
      Reply
      1. M
       Manohar V.
       Sep 6, 2017 at 2:42 pm
       गौरी लंकेश ह्यांची हत्या निंदनीयच व अतिशय वाईट कृत्य आहे. पण आमच्या लहान पप्पूला हे कळत नाही कि कर्नाटकात काँग्रेस चे राज्य आहे , म्हणज्ये याची पहिली जबाबदारी पप्पू तुझ्या पक्षावरच जाते.कायदा व सुव्यवस्था हे पहिल्यांदा प्रत्येक राज्य सरकारची जबाबदारी आहे. पप्पू, उठ सुठ मोदी जी व भा.ज.प. वर टीका करून तुला काय मिळते, बाळा? उलट यामुळे तुझे आणखीन हसे होते ते बघ.
       Reply
       1. D
        dattaram
        Sep 6, 2017 at 2:07 pm
        राहुल जी सारखे उमदे नेते काहीही वक्तव्य करताय आणि लोकसत्ता त्याचा तपास न करताच आपल्या पेपरात छापतंय....कुठे नेवून ठेवलेय पत्रकारिता
        Reply
        1. N
         Nikhil Kamat
         Sep 6, 2017 at 1:54 pm
         हे सर्व ' संपविणे " काँग्रेस शासित राज्यात का होते ? आणि ३/४ वर्षे झाली तरी मारेकऱ्यांचा तपस का लागत नाही ? विचारधारा उजवी म्हणजे ...... डावी म्हणजे ,,,,,, असं आहे काय ? कोणाचाही खून होणे अतिशय निंदाव्यंजक ... पण राज्य सरकार ने आपल्या नागरिकांचे सौंरक्षण केले पाहिजे .. आता तरी आरोप करण्यापेक्षा तपस लावा ..... नाहोतर पुरोहित साध्वी प्रज्ञा सारखे नुसतेच राजकारण ...
         Reply
         1. M
          mathew
          Sep 6, 2017 at 1:52 pm
          RG's comments are so ridiculous. This man has no idea what he talks .
          Reply
          1. D
           digamber
           Sep 6, 2017 at 1:41 pm
           पप्पु आधी खात्री तर करा कोणी मारले का मारले उगीच बोंब ठोकायची, त्या रोहित वेमुला ने वयक्तीत कारणासाठी गळफास घेतला असे सिद्ध झालेच ना. उगीच बालिशपण करू नको रे बाबा त्या मोदींना रेडिमेड मुद्दे देऊन टाकतोस तू.
           Reply
           1. Load More Comments