News Flash

काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र विकास परिषद स्थापन करा

जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित समाजासाठी स्वतंत्र विकास परिषद स्थापन करण्याची मागणी या समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका संघटनेने केली आहे.

| January 9, 2014 12:42 pm

जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित समाजासाठी स्वतंत्र विकास परिषद स्थापन करण्याची मागणी या समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका संघटनेने केली आहे. ही परिषद समाजाला राजकीयदृष्टय़ा सक्षम करून त्यांच्या विकासासाठी कार्यरत राहील, असे उद्दिष्ट आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये विविध क्षेत्र आणि समाजासाठी विकास परिषदा स्थापन करण्याचा केंद्र सरकार विचार करीत असल्याने केंद्र सरकारने काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र विकास परिषद स्थापन करावी, अशी मागणी सर्वपक्षीय स्थलांतरित समन्वय समितीचे अध्यक्ष विनोद पंडित यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
‘पाथ फॉर सव्‍‌र्हायव्हल’ नावाचा एक कृती आराखडा २००५ मध्ये पंतप्रधानांना सादर करण्यात आला असून त्यामध्ये विकास परिषदेची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये समाजाच्या पुनर्वसनाचा पथदर्शक प्रस्तावही मांडण्यात आला होता, असे विनोद पंडित म्हणाले. काश्मिरी विस्थापितांबाबत राज्य आणि केंद्र सरकार घेत असलेल्या भूमिकेमुळे पंडित समाजाला एकाकी पडल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे पंडित समाजाला मंडळांवरही प्रतिनिधित्व द्यावे, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 12:42 pm

Web Title: apmcc demands development council for kashmiri pandits in kashmir
Next Stories
1 अमेरिकी युवकाची सुटका दृष्टिपथात
2 फरार कैद्याला थंडीने भरली हुडहुडी, पोलिसांना गेला शरण!
3 जम्मू-काश्मीर विधानसभेचे व्ही. के. सिंग यांना समन्स
Just Now!
X