स्टीव्ह जॉब्स हे नाव जगात ठाऊक नसलेला माणूस विरळाच असेल. अॅपल या सुप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी चार दशकांपूर्वी म्हणजेच १९७३ मध्ये एका कंपनीला पाठवलेला बायोडेटा पुढील महिन्यात लिलावात निघणार आहे. सध्या त्या बायोडेटाची सोशल मीडियावर चर्चा आहे. हा बायोडेटा मिळवण्यासाठी किमान ५० हजार डॉलरपासून पुढे बोली लावण्यात येईल असा अंदाज लिलावकर्त्यांनी लावला आहे.

ऑक्शन हाऊसने दिलेल्या माहितीनुसार या बायोडेटामध्ये अनेक ठिकाणी स्पेलिंग आणि विराम चिन्हे यांच्या प्रचंड चुका या बायोडेटामध्ये आहेत. तसेच हा बायोडेटा अवघ्या एका पानाचच आहे. नोकरीसाठी दिलेल्या या बायोडेटामधे स्टीव्ह जॉब्स यांनी त्यांचे नावही स्टीव्हन असे लिहिले होते. तसेच ऑरेगन ऐवजी रीड असेही लिहिले होते. एवढेच नाही तर बायोडेटामध्ये कॅलफोर्नियाच्या कंपनीत हेवलट पॅकर्डचे नाव चुकून हेविट पॅकर्ड असे लिहिले होते. अर्जात स्टीव्ह जॉब्स यांनी ड्रायव्हिंग चा परवाना असेही म्हटले होते. या अर्जात जॉब्स यांनी कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे हेदेखील नमूद केले नव्हते.

स्टीव्ह जॉब्स यांच्या बायोडेटाचा लिलाव ८ ते १५ मार्च दरम्यान होईल. स्टीव्ह जॉब्स यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९५५ ला झाला. २०११ मध्ये म्हणजेच वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आता त्यांच्या पहिल्या बायोडेटाचा लिलाव केला जाणार आहे. ‘द गार्डियन’ ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.