स्मार्टफोन्सच्या जालात लवरकच अॅपल कंपनी आयफोन ६ बाजारात दाखल करण्याची चिन्हे आहेत. प्रतिस्पर्धी कंपन्यांचा एचटीसी वन, सॅमसंग गॅलेक्सी एस४, सोनी एक्स्पिरिया झेड या मोबाईल मॉडेल्सनंतर अॅपल कोणता मोबाईल बाजारात दाखल करणार? याकडे सर्वांचे लक्ष एकवटलेले होते. त्यानुसार अॅपल आयफोन ६ यावर्षाच्या अखेरीस बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या आयफोनची स्क्रिन ४.८ इंचाची असणार आहे. तसेच प्रतिस्पर्धी एचटीसी वन मोबाईलमध्ये उत्तम कॅमेरा उपलब्ध करुन दिल्यानंतर आयफोन ६ मध्येही कॅमेऱ्याच्या फिचर्सवर अॅपल कंपनी भर देण्याची शक्यता आहे.
तसेच आयफोन ६ मध्ये वापरण्यात येणारा प्रोसेसरही उच्च दर्जाचा असणार आहे. सध्या आयफोन ५ मध्ये ड्युल-कोअर अॅपल-६ प्रोसेसर उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या आयफोन ६ मध्ये क्योड-कोअर अॅपल-७ प्रोसेसर वापरण्यात येणार आहे. नुकताच तैवान सेमिकंडक्टर मॅन्यूफॅक्चरिंग कंपनीने हा प्रोसेसर अॅपल आयफोन ६ साठी तयार केला आहे. मोबाईलची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नसली, तरी ३२ जीबी मेमरी आयफोन ६ ची किंमत ४५,६६०रु, ६४ जीबी मेमरी मॉडेल ५१,७०४रु आणि १२८ जीबी मेमरी मॉडेलची किंमत ६०,३३५रु. असण्याची शक्यता आहे.