बहुप्रतिक्षित ‘आयफोन ६ एस’ आणि ‘६ एस प्लस’ अखेर भारतीय बाजारपेठेत दाखल झाला असून गुरूवारी मध्यरात्रीपासून या दोन्ही स्मार्टफोन्सच्या विक्रीला सुरूवात झाली आहे. इतर देशांमध्ये हे दोन्ही स्मार्टफोन्स याआधीच लाँच झाले आहेत. सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्कृष्ट हार्डवेअर वापरलेला स्मार्टफोन अशी ओळख असलेल्या अॅपल कंपनीच्या ‘एस’ श्रेणीतील या नव्या दोन अद्ययावत स्मार्टफोन्सला जगभरात उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
आयफोन खरेदीसाठी नाद खुळा, रांग लावण्यासाठी पाठवला रोबोट!
अॅपलने ९ ऑक्टोबरला एकूण ४० देशांमध्ये हे फोन्स लाँच केले होते. पहिल्या तिनच दिवसांत ‘आयफोन ६ एस’ आणि ‘६ एस प्लस’च्या विक्रीने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. आयफोन विक्री केंद्राबाहेर लांबचलांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. भारतातील तंत्रप्रेमींचेही या स्मार्टफोन्सकडे लक्ष लागून होते. अखेर काल मध्यरात्रीपासून अॅपलने ‘आयफोन ६एस’ आणि ‘६ एस प्लस’ मोबाईलच्या भारतातील विक्रीला सुरूवात केली आहे. इतर देशांप्रमाणे भारतातील विक्रीचेही आतापर्यंतचे विक्रम हा फोन मोडीत काढेल, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.