अॅपलचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असा गाजावाजा करत भारतीय बाजारपेठेत दाखल झालेला ‘आयफोन एसई’ येत्या ८ एप्रिलला ग्राहकांना विकत घेता येणार आहे. कंपनीने या फोनची बाजारपेठेतील किंमत ३९ हजार रुपये इतकी जाहीर केली आहे. मात्र, या फोनची निर्मिती करण्यासाठी कंपनीला केवळ दहा हजारांचा खर्च येत असल्याचे ‘आयएचएस’ या रिसर्च कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अहवालातील माहितीनुसार, ‘आयफोन एसई’चा १६ जीबीचा मॉडेल ३९ हजारांत बाजारात उपलब्ध होणार आहे. पण या फोनचे निर्मितीमूल्य केवळ १०,६५३ रुपये इतके आहे. त्यामुळे कंपनीला एका ‘आयफोन एसई’च्या विक्रीमागे तब्बल २८,३४३ रुपयांचा नफा होणार आहे.
दरम्यान, आयफोनचा स्वस्त स्मार्टफोन भारतात दाखल होण्याची चर्चा सुरू असताना त्याची किंमत तीस हजारांपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यात वाढ करून ३९ हजार इतकी करण्यात आली.

IPhone SE: अॅपलचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात

नव्या आयफोनची स्क्रीन चार इंचांची असून त्यामध्ये ६४ बीट ए ९ प्रोसेसर देण्यात आला आहे. यात १६ जीबीची अंततर्गत साठवधूक क्षमता देण्यात आली आहे. तसेच यामध्ये मुख्य कॅमेरा बारा मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. यामध्ये एम ९ कॉम्प्रेसर, सिरि, यामध्ये जलद एलटीई, व्हॉइसओव्हर एलटीई, वायफाय कॉलिंग, ब्लूटय़ूथ ४.२, आयओएस ९.३ अशी अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये फोर के व्हिडीओ देण्यात आला आहे. यामध्ये अ‍ॅपल पेची सुविधाही देण्यात आली आहे.