अॅपलने आयफोन x च्या लाँचिंगची क्यूपर्टिनो येथील आपल्या नव्या मुख्यालयात अखेर घोषणा केली. आयफोन x चे वैशिष्ट्य म्हणजे अॅपलने आपल्या आतापर्यंतच्या आयफोन जनरेशनपेक्षा वेगळे फिचर्स, नवीन डिस्प्ले टेक्नॉलॉजी, फेस आयडी फिचर आणि आणखी बरेच बदल केले आहेत. आयफोन x एडिशन खास आयफोनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त सादर करण्यात आला आहे. दहा वर्षांपूर्वी म्हणजे २००७ मध्ये स्टीव्ह जॉब यांनी पहिला आयफोन लाँच केला होता.

आयफोन x ची स्क्रीन सुपर रेटिना डिस्प्ले व ओएलइडी टेक्नॉलॉजी असलेली आहे. याचे रिझोल्यूशन हे २४३६x११२५ इतके असेल. सुपर रेटिना डिस्प्ले हे HDR10 आणि डॉल्बी व्हिजन HDR व्हेरियंटसला सर्पोट करते. आयफोन x मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी सर्वात मोठा बदल हा २०१४ मध्ये आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसमध्ये करण्यात आला होता.

अॅपलच्या आयफोनमध्ये प्रथमच होम हे बटन नसेल. त्याऐवजी फेस आयडी हे ऑप्शन असेल. फेस आयडीच्या माध्यमातून फोन अनलॉक करता येतो. दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या साहाय्याने फोन अनलॉक होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे अॅपलने म्हटले आहे. त्याचबरोबर युजरला पारंपारिक पासवर्डनेही फोन लॉक करता येऊ शकते.

जाणून घेऊयात आयफोन x ची आणखी काही वैशिष्ट्ये:

– आयफोन x ला A11 बायोनिक प्रोसेसर विथ नॅचरल इंजिन असेल.

– या फोनला दोन १२ एमपी इमेज सेन्सर, f/1.8 अॅपार्चर वाईड अँगल आणि f/2.4 अॅपार्चर टेलिफोटो लेन्स असतील.

– दोन्ही लेन्सेसला ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह कॉड एलईडी ट्रू टोन फ्लॅश आहे. त्याचबरोबर ७ एमपी ट्रू डेप्थ फ्रंट फेसिंग कॅमेरा सेल्फी काढण्यासाठी आहे.

– आयफोन x ची बॅटरी आयफोन ७ पेक्षा २ तास जास्त चालेल असा दावा अॅपलने केला आहे. त्याचबरोबर आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस सारखी वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.

– यामध्ये टॉपवर इन्फ्रारेड कॅमेरा आहे. जो अंधारातही युजरचा चेहरा डिटेक्ट करू शकतो.

-आयफोन x हा फोन मायक्रोस्कोपिक लेवलवर पाणी धूळ प्रतिरोधक आहे. फ्लुरोसंट इफेक्टबरोबर सिल्व्हर आणि स्पेस ग्रे रंगात तो उपलब्ध होईल.

– आयफोन x ६४ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध असेल.

– आयफोन x चे बेसिक मॉडेलची किंमत ही ९९९ डॉलरपासून (अंदाजे ६५ हजार रूपये) पुढे असेल. भारतात तो अंदाजे ८९ हजार रूपयांना मिळू शकेल.

– अॅपल या आयफोनची ऑर्डर घेण्यास २७ ऑक्टोबरपासून सुरूवात करणार आहे. हे फोन ग्राहकांच्या हाती ३ नोव्हेंबर रोजी पडणार आहेत.