News Flash

अ‍ॅपल चीनमधून उत्पादन बंद करणार? फॉक्सकॉनची भारतात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूकीची योजना

भारतात सहा हजार नोकऱ्या निर्माण होणार

आयफोनची निर्मिती करणारी प्रसिद्ध अ‍ॅपल कंपनी हळूहळू चीनमधून आपले उत्पादन प्रकल्प दुसऱ्या देशांमध्ये शिफ्ट करत आहे. अ‍ॅपलशी संबंधित असलेली फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी भारतात व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करत आहे. चेन्नईजवळ श्री पेरुंबुदूर येथे कारखान्याचा विस्तार करण्याचा फॉक्सकॉनचा प्लान आहे. भारतात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. फॉक्सकॉन अ‍ॅपल कंपनीसाठी आयफोनची जोडणी करण्याचे काम करते.

अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरु आहे तसेच करोना व्हायरसचे संकट यामुळे अ‍ॅपल चीनमधून आपले उत्पादन, व्यवसाय हळूहळू दुसऱ्या देशांमध्ये हलवत आहे. अ‍ॅपलने आपल्या क्लायंटसना चीनमधील उत्पादन प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची विनंती केली आहे. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

ग्राहकांशी संबंधित असलेल्या विषयांवर आपण काहीही बोलणार नाही असे फॉक्सकॉनकडून सांगण्यात आले तर अ‍ॅपलने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अ‍ॅपलचा iPhone XR श्री पेरुंबुदूर येथील कारखान्यामध्ये बनवला जातो. तिथे गुंतवणूक करण्याची फॉक्सकॉनची योजना आहे. सध्या फॉक्सकॉन आयफोनचे बहुतांश मॉडेल्स चीनमध्ये बनवते. श्री पेरुंबुदूर येथील प्रकल्पाचा विस्तार झाल्यास सहा हजार नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकते. आंध्र प्रदेशमध्येही फॉक्सकॉनचा प्रकल्प आहे. तिथे ते चीनच्या शाओमी कंपनीसाठी स्मार्टफोन बनवतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 1:18 pm

Web Title: apple moving away from china foxconn to expand india plant dmp 82
Next Stories
1 अमिताभ बच्चन, अभिषेक यांच्या उत्तम प्रकृतीसाठी मध्य प्रदेशात पूजा
2 अखिलेश यादवच्या मुलीनं बारावीत मिळवले ९८ टक्के गुण
3 ट्रम्प यांचा मास्क लूक… पहिल्यांदाच मास्क घालून सार्वजनिक ठिकाणी दिसले
Just Now!
X