News Flash

‘अ‍ॅपल वॉच २’ लॉन्च, अधिक जलद आणि अत्याधुनिक असल्याचा कंपनीचा दावा..

डय़ुएल कोर, दुप्पट ब्राइटनेस यासारख्या सुविधांमुळे हे वॉच अधिक जलद आणि अत्याधुनिक झाले आहे.

‘अ‍ॅपल वॉच टू’ आणि ‘आयफोन सेव्हन’चे सॅनफ्रॅन्सिस्को येथे अनावरण करण्यात आले.

अ‍ॅपलप्रेमींना नव्या आयफोन आणि नव्या आयवॉचमध्ये सर्वोत्तम हार्डवेअर आणि आकर्षक अ‍ॅप्ससोबतच गेम्सची मेजवानी मिळाली आहे. यामध्ये ‘सुपर मारीओ’ आणि ‘पोकेमॉन गो’चे वैशिष्ठय़ असणार आहे. नव्या अ‍ॅपल मॅचमध्ये ‘पोकेमॉन गो’ हा गेम असणार आहे. याचबरोबर हा गेम खेळताना उपयुक्त अशा अनेक पूरक अ‍ॅप्सचाही यात समावेश करण्यात आला आहे.
अ‍ॅपल वॉचला अधिक चांगला प्रतिसाद मिळत असून रोलेक्स नंतर ते दुसऱ्या स्थानावर आल्याचे अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष टिम कूक यांनी स्पष्ट केले. सॅनफ्रान्सिस्को येथे रंगलेल्या दिमाखदार सोहळय़ात ‘अ‍ॅपल वॉच टू’ आणि ‘आयफोन सेव्हन’चे अनावरण करण्यात आले. ‘अ‍ॅपल वॉच टू’मध्ये अधिक प्रगत अशा सुविधा देणाऱ्या ‘अ‍ॅपल वॉच ओएस थ्री’चे अनावरण केले. आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणाऱ्या अ‍ॅप्सपासून गेमच्या अ‍ॅपचा समावेश करण्यात आला आहे. नवे अ‍ॅपल वॉच हे जलप्रतिरोधक असणार आहे. यामुळे पोहतानाही हे घडय़ाळ तुम्ही बिनदिक्कत वापरू शकणार आहात. जलप्रतिरोधक उपकरणात स्पीकरची अडचण नेहमीच जाणवत असते. मात्र यावरही कंपनीने तोडगा काढला आहे. यामध्ये ‘बिल्ट इन जीपीएस’ देण्यात आले आहे. यामुळे गिर्यारोहण करणाऱ्यांना विशेष मदत होणार असल्याचा विश्वास कंपनीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
डय़ुएल कोर, दुप्पट ब्राइटनेस यासारख्या सुविधांमुळे हे वॉच अधिक जलद आणि अत्याधुनिक झाले आहे. यामध्ये क्रीडा विभागासाठी अ‍ॅपल वॉच नाइकी प्लस हे विशेष घडय़ाळ अ‍ॅपलने बाजारात आणले आहे. या अ‍ॅपल वॉचची किंमत २६९ अमेरिकन डॉलर इतकी असणार आहे.

*फिचर-

GPS ची सुविधा ..*ड्युअल कोर प्रोसेसर * पाणी प्रतिकारक. डिस्पेवर दोन वेळा ब्राइटनेसची सुविधा. त्यामुळे वापरकर्तास कनेक्ट आणि सक्रिय राहण्यास मदत होईल. या वॉचची डिझाइन परिपूर्णतेचे दर्शन घडविणारी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 12:51 am

Web Title: apple watch series 2 announced with swimproof
Next Stories
1 ‘त्या’ पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करा!
2 देशातील जनता त्रस्त असताना पंतप्रधान मोदी मस्त: राहुल गांधी
3 Apple iPhone 7 launch: आयफोन ७ आला रे…
Just Now!
X