भारतीय जनता पार्टीचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी बुधवारी लोकसभेत बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वीच बांगलादेशमधुन चालवल्या जाणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलचा बंगळुरात भांडाफोड करण्यात आला होता. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. मी केंद्र सरकारकडे मागणी करतो की कर्नाटकातही नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप (एनआरसी) लागू करावे. जेणेकरून बंगळुरातही बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणे शक्य होईल.

काही दिवस अगोदरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत एनआरसीला विरोध केल्याबद्दल काँग्रेसवर टीक केली होती. मोदींनी म्हटले होते की, भाजपासाठी हा काही राजकीय मुद्दा नाही. आम्ही संपूर्ण निष्ठेने एनआरसी लागू करू, आम्ही त्यासाठी वचनबद्ध आहोत. एनआरसीबरोबर देशाची एकता, अखंडता आणि भावी समृद्धीचा मुद्दा जुडलेला आहे.

खासदार तेजस्वी सूर्या हे दक्षिण बंगळुरू लोकसभा मतदार संघातून विजयी झालेले आहेत. २८ वर्षीय तेजस्वी सूर्या यांनी गत लोकसभा निडवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बी के हरिप्रसाद यांचा पराभव केला आहे.