07 March 2021

News Flash

संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीवर मनमोहन सिंग नियुक्त

दिग्विजय सिंह यांची नागरी विकास खात्याच्या स्थायी समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसचे आधीचे सदस्य दिग्विजय सिंह यांच्या जागी डॉ. मनमोहन सिंग यांची नियुक्ती केली आहे.

दिग्विजय सिंह यांची नागरी विकास खात्याच्या स्थायी समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्तीही नायडू यांनीच केली आहे. मनमोहन सिंग यांच्यासाठी दिग्विजय सिंह यांनी संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीचा राजीनामा दिला होता. मनमोहन सिंग हे १९९१ ते १९९६ दरम्यान देशाचे अर्थमंत्री होते, तसेच सप्टेंबर २०१४ ते मे २०१९ दरम्यान ते अर्थविषयक स्थायी समितीचे सदस्य  व राज्यसभेचे सदस्य होते. नंतर जूनमध्ये त्यांची राज्यसभेची मुदत संपली व ऑगस्टमध्ये राजस्थानातून ते राज्यसभेवर पुन्हा बिनविरोध निवडून आले.

मागील काळात अर्थविषयक स्थायी समितीने वस्तू व सेवा कर, निश्चलनीकरण म्हणजे नोटाबंदी हे विषय हाताळले होते. दरम्यान, आता नवीन  बदलात दिग्विजय सिंह यांना नागरी विकास खात्याच्या स्थायी समितीचे सदस्यपद देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 1:29 am

Web Title: appointment of manmohan singh to the standing committee on finance abn 97
Next Stories
1 ट्रम्प महाभियोगप्रकरणी उद्यापासून खुली सुनावणी
2 भारतात मोसमी पावसाचा मुक्काम लांबल्याने ऑस्ट्रेलियात वणवे
3 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीला शपथविधी शक्यता?
Just Now!
X