News Flash

लष्करातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती 

या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दरमहा ठरावीक रक्कम दिली जाईल.

| May 10, 2021 01:35 am

(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : लष्कराच्या आर्मी मेडिकल कॉर्प्स (एएमसी) आणि अल्पकालीन सेवेतील (शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन- एसएससी) ४०० सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना कमाल ११ महिन्यांसाठी कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्याचा आदेश संरक्षण मंत्रालयाने सशस्त्र दले वैद्यकीय सेवेला (एएफएमएस) आहे.

भारत सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेत होरपळत असून, अनेक राज्यांमधील रुग्णालयांना आरोग्य कर्मचारी, लशी, प्राणवायू, औषधे व खाटा यांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘टूर ऑफ डय़ुटी’ योजनेखाली, २०१७ ते २०२१ या कालावधीत निवृत्त झालेल्या एएमसी/ एसएससीच्या ४०० माजी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कमाल ११ महिन्यांसाठी कंत्राटी तत्त्वावर नेमले जाणे अपेक्षित आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दरमहा ठरावीक रक्कम दिली जाईल. निवृत्तीच्या वेळेस त्यांना मिळणाऱ्या वेतनातून सेवानिवृत्तीची मूळ रक्कम वजा करून ही रक्कम ठरवली जाईल. तज्ज्ञांसाठी अतिरिक्त वेतन देण्याची आवश्यकता असेल, तर ती ठरावीक रकमेव्यतिरिक्त अदा केली जाईल, असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

करोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सशस्त्र दले वैद्यकीय सेवेने (एएफएमएस) यापूर्वीच तज्ज्ञ, सुपर स्पेशालिस्ट व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त डॉक्टरांची निरनिराळ्या रुग्णालयांमध्ये नेमणूक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 1:35 am

Web Title: appointment of retired medical officers on contract basis under tour of duty scheme zws 70
Next Stories
1 रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’वर नेमणूक
2 अफगाणिस्तान : शाळेतील बॉम्बस्फोटातील मृत्युसंख्या ५०
3 उत्तर प्रदेशात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर!; केंद्रीय मंत्र्याने केली कानउघाडणी
Just Now!
X