News Flash

कुख्यात वीरपन्नचा खात्मा करणाऱ्या अधिकाऱ्याची जम्मू-काश्मीरमध्ये नियुक्ती

या दोन्ही अधिकाऱ्यांनी नक्षलवादी तसेच चंदन तस्कर विरप्पनचा खात्मा केला आहे. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी हे दोघेही सज्ज झाले आहेत.

के. विजयकुमार

जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आहे. त्यानंतर आता दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्याची तयारीही सरकारने सुरु केल्याचे दिसते. कारण, राज्यपाल एन. एन. वोहरा यांच्या सल्लागारपदी दोन महत्वाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी नक्षलवादी तसेच चंदन तस्कर वीरप्पनचा खात्मा केला आहे. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी हे दोघेही सज्ज झाले आहेत.

या दोन अधिकाऱ्यांची नावे अनुक्रमे बी. बी. व्यास आणि कें. विजयकुमार अशी आहेत. यांपैकी विजयकुमार हे तामिळनाडूतील १९७५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. १९९८-२००१ मध्ये ते काश्मीर खोऱ्यात बीएसएफचे महानिरिक्षक होते. त्यावेळी सीमा सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात मोठी करावाई केली होती. ६५ वर्षांचे विजयकुमार स्पेशल टास्क फोर्स अर्थात एसटीएफमध्ये तैनात होते. त्यावेळी ते सर्वाधिक चर्चेत राहिले होते. २००४मध्ये चंदनतस्कर वीरप्पनला घेरून त्याचा खात्मा करणारे अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. २०१०मध्ये जेव्हा दंतेवाडात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या ७५ जवानांची हत्या केली होती. त्यावेळी नक्षलींवर नियंत्रण मिळवण्यासाठी विजयकुमार यांना सीआरपीएफच्या संचालकपदी बढती देण्यात आली होती. त्यामुळे आता हे स्पष्ट आहे की, नक्षलवाद्यांनंतर आता दहशतवाद्यांची वेळ आहे.

तर, दुसरीकडे ६० वर्षीय आयएएस बी. बी. व्यास हे राज्यपाल वोहरा यांचे विश्वासू मानले जातात. व्यास ज्यावेळी राज्याचे मुख्य सचिव होते त्यावेळी ३१ मे २०१८ रोजी त्यांना सेवाकाळात १ वर्षांची मुदतवाढही देण्यात आली आहे. व्यास यांची एक हुशार आयएएस अधिकारी म्हणून ख्याती आहे.

त्याचबरोबर जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेले बीव्हीआर सुब्रमण्यम हे यापूर्वी छत्तीसगढचे गृहसचिव होते. देशांतर्गत सुरक्षेसंबंधी विशेषज्ज्ञ म्हणून सुब्रमण्यम यांची ओळख आहे. सुब्रमण्यम माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे खासगी सचिवही राहिले आहेत. सुब्रमण्यम यांनी जागतिक बँकेसोबतही काम केले आहे. २०१४मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची नियुक्ती पीएमओ कार्यालयात करण्यात आली होती. त्यानंतर ते छत्तीगढ केडरमध्ये पुन्हा रुजू झाले होते.

बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र यांनी सुब्रमण्यम यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवपदी नियुक्तीला तसेच आयएएस बी. बी. व्यास आणि आयपीएस विजयकुमार यांची राज्यपालांचे सल्लागार म्हणून नियुक्तीला मंजुरी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 4:39 pm

Web Title: appointment of the infamous officer in jammu kashmir who cesser to virappan
Next Stories
1 काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान एकाकी, भारताची बाजू भक्कम
2 जम्मू-काश्मीरच्या भाजप प्रदेशाध्याला पाकिस्तानातून धमक्या?
3 दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी बोलले म्हणून मारले गेले-गुलजार
Just Now!
X