करोना व्हायरसमुळे भारतासह जगभरात एक भीतीचं वातावरण आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ३२ झाली आहे. राज्य सरकारने कालच सांगितल्याप्रमाणे खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ अर्थात घरुन काम करण्याची मुभा द्यावी असंही म्हटलं आहे. मात्र वर्क फ्रॉम होम हे म्हणावं तितकं सोपं नाही. हे सांगण्याचं कारण म्हणजे बीबीसीचा व्हायरल झालेला व्हिडीओ.

काय आहे व्हिडीओ?

बीबीसीचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत बीबीसीच्या स्टुडिओतून एका माणसाशी बातम्या सुरु असताना संवाद साधला जातो आहे. हा माणूस त्याच्या घरी आहे. त्याचं लाईव्ह सुुरु आहे अशातच तो बोलत असताना एक लहान मूल तिथे येतं. त्यानंतर दुसरं लहान मूल येतं. हे सगळं बीबीसीचं न्यूज बुलेटीन सुरु असताना घडतं. त्यानंतर लाईव्ह देणाऱ्या माणसाची पत्नी येते आणि ती मुलांना घेऊन जाते. वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिल्यानंतर असं काही घडलं तर काय करायचं? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. इतकंच नाहीतर बीबीसीची ही क्लिप चांगलीच व्हायरलही होते आहे.

बीबीसीचा हा व्हिडीओ जुना आहे असं समजतं आहे. मात्र करोना व्हायरसची दहशत लक्षात घेऊन या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातल्या काही कंपन्यांकडून वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला आहे. अशात महाराष्ट्रातही अशा प्रकारचा पर्याय देण्यात यावा असा विचार होतो आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांनी याबाबतचं आवाहन केलं आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर ही क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. जर आम्ही घरुन काम करत असू आणि असं काही झालं तर काय? हा आणि अशा आशयाचे प्रश्न नेटकरी विचारत आहेत.