25 February 2021

News Flash

‘आर्गो’ सर्वोत्कृष्ट

एकाच चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार पटकावत संपूर्ण सोहळा खिशात घालण्याची परंपरा यंदाच्या ८५व्या ऑस्कर समारंभाने खंडित केली. बेन अफ्लेक दिग्दर्शित ‘आर्गो’ या चित्रपटाने मानाच्या सवरेत्कृष्ट चित्रपटासह

| February 26, 2013 07:46 am

‘लाइफ ऑफ पाय’चा पुरस्कार चौकार
एकाच चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार पटकावत संपूर्ण सोहळा खिशात घालण्याची परंपरा यंदाच्या ८५व्या ऑस्कर समारंभाने खंडित केली. बेन अफ्लेक दिग्दर्शित ‘आर्गो’ या चित्रपटाने मानाच्या सवरेत्कृष्ट चित्रपटासह तीन पुरस्कार पटकावले, तर १२ नामांकनांचा गाजावाजा झालेल्या ‘लिंकन’ या चित्रपटाला केवळ दोन पुरस्कारांवर समाधान मानावे लागले.
‘लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटासाठी अँग ली यांना सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार अनपेक्षितरीत्या लाभला, तर सवरेत्कृष्ट पटकथेच्या पुरस्कारावर क्वेन्टीन टेरेन्टिनो (जंगो अन्चेण्ड) याने आपले नाव कोरले. दावेदार मानल्या गेलेल्या कोणत्याही चित्रपटाला चारहून अधिक पुरस्कारांपलीकडे मजल मारता आली नाही, ही यंदाच्या ऑस्कर सोहळ्यातील वैशिष्टय़पूर्ण बाब होती.
‘आर्गो’चे यश
इराणमधील कॅनडाच्या दूतावासामध्ये अडकलेल्या सहा अमेरिकी नागरिकांना सोडविण्यासाठी सीआयएने उभारलेले नाटय़ रंगविणारा ‘आर्गो’ यंदाचा सवरेत्कृष्ट सिनेमा ठरला. ‘लिंकन’, ‘झीरो डार्क थर्टी’ आणि ‘बीस्ट ऑफ द सदर्न वाइल्ड’ या तगडय़ा दावेदार स्पर्धकांवर मात करून ‘आर्गो’ला हा सन्मान मिळाला. रूपांतरित पटकथा आणि संकलन या आणखी दोन गटातील पुरस्कारही ‘आर्गो’च्या वाटय़ाला गेला. सवरेत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकन असलेले बहुतांश चित्रपट विजेते हे सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाच्या पुरस्काराचेही मानकरी होतात. मात्र दिग्दर्शनाच्या नामांकनात ‘आर्गो’ला स्थान न मिळाल्यामुळे त्याच्याबाबत अपवादात्मक परिस्थितीत विजयाची माळ पडल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी १९९०मध्ये ‘ड्रायव्हिंग मिस डेझी’ या चित्रपटालाही याप्रमाणेच सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.

सवरेत्कृष्ट चित्रपट : आर्गो
सवरेत्कृष्ट दिग्दर्शक : अँग ली (लाईफ ऑफ  पाय)
सर्वोत्तम अभिनेता : डॅनियल डे लेविस (लिंकन)
सर्वोत्तम अभिनेत्री : जेनिफर लॉरेन्स (सिल्व्हर लायनिंग्ज प्लेबुक)
सवरेत्त्म सहायक अभिनेता : ख्रिस्तोफ वॉल्ट्झ (जंगो अनचेण्ड)
सर्वोत्तम सहायक अभिनेत्री : अ‍ॅन हॅथवे (ले मिझरेबल)
सवरेत्कृष्ट पटकथा : क्वेन्टीन टेरेन्टीनो (जंगो अन्चेण्ड)
सवरेत्कृष्ट  परभाषिक चित्रपट : आमोर

  ‘लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटाने दिग्दर्शनाच्या अत्यंत महत्त्वाच्या, तसेच तांत्रिक गटांतील तीन पुरस्कारांवर आपली छाप उमटविली. स्टीव्हन स्पीलबर्ग दावेदार मानल्या जाणाऱ्या दिग्दर्शनाच्या पुरस्कारावर अँग ली या तैवानी-अमेरिकी दिग्दर्शकाने नाव कोरले आणि आपल्या आभारप्रदर्शक भाषणाची अखेर ‘नमस्ते’ या शब्दाने करून ‘लाइफ ऑफ पाय’मधील भारतीयत्त्वाची आठवण जागविली. ‘ले मिझेरबल’ या चित्रपटासाठी अ‍ॅन हॅथवे व ‘जंगो अन्चेण्ड’साठी ख्रिस्तोफर वॉल्ट्झ यांना सहायक अभिनेत्री-अभिनेत्याचे अपेक्षित पारितोषिक मिळाले. सर्वोत्तम अभिनेत्याचे पारितोषिक डॅनियल डे लुईस याला मिळाले. कारकिर्दीतील सर्वोत्तम अभिनेत्याचे त्याने पटकावलेले हे तिसरे पारितोषिक होते. सर्वोत्तम अभिनेत्रीच्या तुल्यबळ गटामध्ये जेनिफर लॉरेन्स हिने ‘सिल्व्हर लायनिंग्ज प्लेबुक’साठी पुरस्कार मिळविला. सवरेत्कृष्ट परभाषिक चित्रपट म्हणून ऑस्ट्रियाच्या ‘आमोर’ आणि सवरेत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपटासाठी पिक्झारच्या ‘ब्रेव्ह’ या चित्रपटाला पुरस्कार लाभला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2013 7:46 am

Web Title: argo is best of all life of pi gets four awards
Next Stories
1 रेल्वेमंत्र्यांच्या पेटाऱयातून कोणाला काय मिळणार?
2 रेल्वे अर्थसंकल्प २०१३: ‘… हे तर रायबरेली बजेट’
3 रेल्वे अर्थसंकल्प २०१३: महाराष्ट्राच्या वाट्याला १२ एक्स्प्रेस गाड्या
Just Now!
X