News Flash

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणानंतर ट्विटरवर ‘अरहर मोदी’ लाट

कार्यकर्त्यांनी #ModiJiArrestMeToo हा हॅशटॅग ट्रेंडीगमध्ये आणला होता.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत महागाईच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. राहुल यांनी लोकसभेतील आपल्या छोट्या भाषणाची सांगता ‘अरहर मोदी’ अशी केली होती. त्यांच्या या शब्दाला  इंटरनेटकरांनी उचलून धरले आहे.याचीच प्रचिती ट्विटरवर पाहायला मिळते आहे. सध्या ट्विटरवर  #ArharModi  ‘ट्रेंडींग’मध्ये आहे. यापुर्वी सकाळी मोदीविरोधात आप कार्यकर्त्यांनी #ModiJiArrestMeToo हा हॅशटॅग ट्रेंडीगमध्ये आणला होता.’स्टार्टअप इंडिया’ आणि ‘स्वच्छता भारत’ अभियान’ याव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी महागाईवर मौन बाळगल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केली होती. लोकसभेतील राहुल गांधी यांच्या भाषणातील ‘अरहर मोदी’ या शब्दाने सोशल मीडियावर निर्माण झालेल्या अरहर मोदी’ या हॅशटॅवर हजारो राहुल समर्थकांनी ट्टविट केले आहे. या सोशल ‘वार’चा सामना करण्यासाठी भाजप समर्थकही पुढे सरसावले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 6:30 pm

Web Title: arhar modi is trending on twitter
Next Stories
1 हे तर आकडे न पाहताच केलेले आरोप, जेटलींचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
2 २६/ ११ दहशतवादी हल्यातील ‘त्या’ बोटीचा तपास करणे भारताला शक्य होणार
3 महागाई कधी कमी करणार नक्की तारीख सांगा, राहुल गांधींची मागणी
Just Now!
X