05 August 2020

News Flash

“अर्जुनाच्या बाणामध्ये आण्विक शक्ती होती”; राज्यपालांचा दावा

"भारताकडे दूर्लक्ष करणे जगाला परवडणार नाही"

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर

“रामायणाच्या काळात आपल्याकडे विमाने होती. महाभारतामध्ये अर्जुनाच्या बाणामध्ये आण्विक शक्ती होती,” असा दावा पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर केला आहे. विद्यार्थ्यांना संबोधित करताना धनकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दक्षिण कोलकात्यामधील बिर्ला इंडस्ट्रीयल अॅण्ड टेक्नोलॉजिकल म्युझियमचे उद्घाटन राज्यपाल धनकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी भारताकडे अनेक शतकांपासून वैज्ञानिक ज्ञान असल्याचा दावा करताना रामायण आणि महाभारतामधील संदर्भ दिले. “विमानांचा शोध १९१० किंवा १९११ च्या दरम्यान लागला. मात्र तुम्ही आपल्या वेदांचा अभ्यास केल्यास आपल्याकडे रामायणाच्या काळात उडणाऱ्या वस्तू (विमाने) असे लक्षात येईल. टीव्हीसारखी माध्यमे नव्हती संजयने संपूर्ण महाभारत युद्ध ऐकले. महाभारतामध्ये संजय कुरुश्रेत्रातील युद्धभूमीपासून लांब असूनही धृतराष्ट्राला युद्धाची सर्व माहिती दिली. कारण संजयकडे दिव्यदृष्टीसारखी शक्ती होती. महाभारतामध्ये अर्जुनाच्या बाणामध्ये अण्विक शक्ती होती,” असं धनकर आपल्या भाषणामध्ये म्हणाले. “तेव्हाच आपण इतके शक्तीशाली होतो. त्यामुळे भारताकडे दूर्लक्ष करणे जगाला परवडणार नाही,” असंही धनकर आपल्या भाषणामध्ये म्हणाले. धनकर यांना आता सोशल नेटवर्कींगवर अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

रामायण आणि महाभारताचा संदर्भ यांनाही दिलाय

याआधीही भाजपाचे अनेक नेत्यांनी रामायण आणि महाभारताचा संदर्भ देत पुष्कर विमान आणि आधुनिक तंत्रज्ञान भारतीयांकडे अनेक शतकांपासून असल्याचा दावा केला आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी २०१८ साली, “महाभारताच्या काळात इंटरनेट तंत्रज्ञान असल्याने संजयने ध्रृतराष्ट्राला युद्धभूमीवर परिस्थिती सांगता आली,” असा दावा केला होता. तर २०१९ साली नोव्हेंबर महिन्यामध्ये बंगलाचे भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी गाईच्या दुधामध्ये सोनं असतं असा दावा केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 11:36 am

Web Title: arjuns arrows had nuclear power says west bengal governor jagdeep dhankhar scsg 91
Next Stories
1 JNU violence : तोंडावर मास्क बांधलेली ‘ती’ तरुणी ‘अभाविप’ची सदस्य
2 आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट
3 ‘आप’ने १५ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले
Just Now!
X