News Flash

छत्तीसगडमध्ये शस्त्रसाठा जप्त

पोलिसांनी माओवाद्यांच्या शोधासाठी परिसरात मोहीम हाती घेतली आहे.

छत्तीसगडमधील माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या कांकेर जिल्ह्य़ात सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांच्या  संयुक्त कारवाईत शस्त्रास्त्राचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ३२ एमएमचे पिस्तूल, १ जिवंत काडतूस, ११ पिस्तूल, २० डेटोनेटर्स, १५ एसएलआर आणि २५ रायफल्सची काडतुसे, ६ जिलेटिनच्या नळ्या, २.५ किलोचे जिलेटिन मिश्रण, १८ किलो वजनाचे लोखंडाचे तुकडे, सुतळी बॉम्बची दोन पाकिटे आणि १ एसएलआर रायफलचे मॅगझिन जप्त केले गेले. याशिवाय ५२ पेन्सिल सेल आणि स्फोट घडविणारे आधुनिक आयईडी (रिमोट) देखील जप्त केले आहे.

ताडोकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जंगलात माओवाद्यांनी मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा लपवल्याची माहिती शनिवारी रात्री परिसरात टेहळणी करणाऱ्या सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारावर रविवारी कारवाई केली गेली. याचबरोबर पोलिसांनी माओवाद्यांच्या शोधासाठी परिसरात मोहीम हाती घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 2:05 am

Web Title: arms seized in chhattisgarh
Next Stories
1 २८ दिवसांच्या अर्भकावर अत्याचार
2 राजस्थानमध्ये व्हॅन- ट्रकच्या भीषण धडकेत १८ ठार; ४० जखमी
3 राष्ट्रपती, पंतप्रधानांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली
Just Now!
X