05 March 2021

News Flash

लष्करप्रमुखांची भारत-चीन सीमेला भेट

लष्करप्रमुख जनरल बिक्रमसिंग यांनी रविवारी भारत-चीन सीमेवर भारतीय लष्कराच्या तयारीचा आढावा घेतला. मे महिन्यात लष्करप्रमुखपद स्वीकारल्यानंतर प्रथमच बिक्रमसिंग यांनी लष्कराच्या पूर्व कमांडला भेट दिली. यावेळी

| December 3, 2012 02:19 am

लष्करप्रमुख जनरल बिक्रमसिंग यांनी रविवारी भारत-चीन सीमेवर भारतीय लष्कराच्या तयारीचा आढावा घेतला. मे महिन्यात लष्करप्रमुखपद स्वीकारल्यानंतर प्रथमच बिक्रमसिंग यांनी लष्कराच्या पूर्व कमांडला भेट दिली. यावेळी पूर्व विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल दलबीरसिंह सुहाग उपस्थित होते.गेल्या काही महिन्यांपासून भारताने चीनलगतच्या सीमारेषेवर पायाभूत सोयीसुविधांच्या उभारणीचा उपक्रम हाती घेतला आहे. आपत्कालीन परिस्थितीत लष्कराच्या हालचाली जोरदार व्हाव्यात यासाठी ही तयारी सुरू आहे. या कमांडमध्ये लष्कराची तयारी कितपत आहे याचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख शनिवारपासून या भागाच्या दौऱ्यावर आहेत.
रविवारी त्यांनी प्रत्यक्ष जवानांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. लेफ्टनंट जनरल सुहाग यांनीही लष्करी तुकडय़ांच्या तयारीची माहिती लष्करप्रमुखांना दिली.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2012 2:19 am

Web Title: army chief reviews security situation along china border
टॅग : Army Chief
Next Stories
1 भाजप नेत्यांना मोदीस्तुतीचे भरते
2 काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीचा ‘द इकॉनॉमिस्ट’कडून पर्दाफाश!
3 पाकिस्तानात नितीश यांच्यापेक्षा मीच अधिक प्रसिद्ध- लालूप्रसाद
Just Now!
X