News Flash

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

उरी सेक्टर येथे घुसखोरीचा प्रयत्न सुरू होता.

भारतीय जवानांचे संग्रहित छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर येथे घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी यमसदनास धाडले. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा दलाकडून अजूनही दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. सविस्तर वृत्त अद्याप आलेले नाही.

दरम्यान, शनिवारी पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस दलावर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी पुलवामा येथे राजपुरा पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला होता, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दि. २ नोव्हेंबर रोजी अनंतनाग जिल्ह्यात एका दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान जखमी झाले होते. सीआरपीएफच्या ९६ बटालियनवर हा हल्ला करण्यात आला होता. ९६ बटालियना ताफा मत्तान शहरात परतत होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी सहा बसवर हल्ला केला होता. या हल्ल्याला लगेचच प्रत्युत्तर देण्यात आले. पण यामध्ये दोन जवान किरकोळ जखमी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2017 10:07 am

Web Title: army foils infiltration bid kills two terrorists in jks uri sector
Next Stories
1 जर्मन नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी एक जण अटकेत
2 राहुल गांधींना ‘जीएसटी’ अजून समजलाच नाही, अरूण जेटलींचा टोला
3 तब्बल ९१८ किलोची खिचडी गिनेस बुकमध्ये
Just Now!
X