१९८७ मध्ये सैन्याने राजीव गांधी सरकार पाडण्याचा कट रचला होता असा खळबळजनक खुलासा माजी लेफ्टनंट जनरल  पी एन हून यांनी केला आहे.  आपल्या ‘अनटोल्ड ट्रूथ’ या पुस्तकातून त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
१९८७ मध्ये हून हे पश्चिम विभागाचे आर्मी कमांडर म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्या हाती एक पत्र लागले होते, या पत्रात सैन्याने तीन निमलष्करी जवानांच्या तुकड्या मागवल्या होत्या. या तीन तुकड्या दिल्लीकडे कुच करणार होत्या असा दावा हून यांनी केला आहे. याची माहिती पंतप्रधान राजीव गांधी व तत्कालीन केंद्रीय मुख्य सचिव गोपी अरोरा यांनाही दिली होते असे हून यांनी म्हटले आहे.  तत्कालीन लष्कर प्रमुख कृष्णस्वामी सुंदरजी, लेफ्ट. जनरल एस.एफ. रॉड्रीग्ज हे अधिकारी देखील या कटात सहभागी होते असा आरोप हून यांनी केला आहे. तसेच, ज्‍या नेत्‍यांचे राजीव गांधी यांच्‍यासोबत पटत नव्‍हते त्‍यांचाही यात सहभाग असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, प्रदीर्घ काळ भारतीय सैन्यात काम करणारे हवाई दलाचे माजी प्रमुख रणधिर सिंह यांनी हून यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.