News Flash

पाकिस्तानच्या गोळीबारात लष्कराचा JCO शहीद

तीन दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने अशाच प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.

जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ बुधवारी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा ज्यूनियर अधिकारी (JCO) शहीद झाला. राजौरी सेक्टरच्या केरी भागात जेसीओ राजेश कुमार शहीद झाले अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली.

तीन दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने अशाच प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यातही एक जेसीओ शहीद झाला होता. आज शस्त्रसंधी उल्लंघनात आणखी एक जेसीओ शहीद झाला. पाकिस्तानने छोटया शस्त्रास्त्रांनी गोळीबार केला.

पाकिस्तानी सैन्याने नौशेरामधील कालसियन, खानगेर, भावनी येथील फॉरवर्ड पोस्टना लक्ष्य केले. जखमी झालेल्या जेसीओला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. पण तिथे त्याचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 2:06 pm

Web Title: army jco killed in pakistan ceasefire second casualty this week dmp 82
Next Stories
1 ‘मन की बात’मध्ये मोदींनी उल्लेख केलेल्या भारतीय Apps ची चलती; प्ले स्टोअरवर Top 10 मध्ये दाखल
2 कचऱ्याच्या ढिगामुळे ‘राफेल’ फायटर विमानांच्या सुरक्षेला धोका
3 “मोदी सरकारने मुद्दाम भारताला आर्थिक संकटात ढकललं”
Just Now!
X