जम्मू- काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय सैन्यातील एक मेजर शहीद झाले आहेत. तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. सकाळपासूनच दहशतवादी आणि भारतीय सैन्यांमध्ये चकमक सुरू होती. यामध्ये भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

अनंतनाग परिसरात दहशतवादी लपून बसल्याचे समजल्यानंतर भारतीय जवानांनी शोध मोहीम केली होती. त्यावेळी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या परिसरात अद्याप आणखी दहशतवादी लपलेले असल्याची शक्यता आहे.

चकमकीत जखमींना उपचारासाठी श्रीनगरमधील लष्कराच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे लष्कारातील एका आधिकाऱ्यानं सांगितलं आहे. सकाळी भारतीय सैन्यानं दहशतावादी लपलेल्या अनंतनाग परिसरातील त्या भागाला घेरले होते. त्यावेळी दहशदवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरदाखल भारतीय सैन्यांनीही गोळीबार केला. त्यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्यांना यश आल्याचे आधिकाऱ्यानं सांगितले.

दरम्यान, बुधवारी १२ जून रोजी अनंतनागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात पोलिस आधिकारी अरशद अहमद जखमी झाले होते. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.