24 September 2020

News Flash

लष्कर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली

प्रश्नपत्रिका फुटल्याने बिकानेर येथील लष्कर भरती परीक्षा रविवारी रद्द करण्यात आली. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

| September 1, 2014 02:53 am

ठार मारण्यात आलेले सर्व दहशतवादी परदेशी नागरिक असल्याचे तपासामध्ये स्पष्ट झाले.

प्रश्नपत्रिका फुटल्याने बिकानेर येथील लष्कर भरती परीक्षा रविवारी रद्द करण्यात आली. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
ऑल इंडिया सेना भरती (जनरल डय़ुटी सैनिक) परीक्षेचा लेखी पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आर्मी पब्लिक स्कूलमध्ये रविवारी सकाळी १० वाजता ही परीक्षा सुरू होणार होती. पेपर फुटल्याने ती रद्द करण्यात आली, असे समन्वयक अजय कपिल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रकरणी चार माजी लष्करी अधिकाऱ्यांसह नऊ जणांना राजस्थान विशेष कृती दलाने पोलिसांच्या ‘एटीस’ शाखेच्या मदतीने अटक केल्याचे ते म्हणाले. ७०० उमेदवार ही परीक्षा देण्यासाठी बिकानेर येथील लष्करी सार्वजनिक शाळेत जमा झाले होते. परंतु प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती मिळताच परीक्षा रद्द करण्यात आल्याचे त्यांना कळवण्यात आले आहे. पहाटे प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 2:53 am

Web Title: army recruitment exams paper leaked
Next Stories
1 उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार
2 नागरिकांना अन्न; दहशतवाद्यांवर बॉम्बवर्षांव
3 भारतीय पदार्थावर युवराज चार्ल्स यांचा ताव
Just Now!
X