अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. देशात विरोधी पक्षांकडून या संवादाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही गोस्वामी यांच्या व्हायरल झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकार भारताला वाईट देशांच्या गर्तेत ढकलत आहे,” असं विधान खान यांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे याची चर्चा सुरू झाली. दोघांमधील संवादामध्ये मंत्र्याबद्दलही आक्षेपार्ह विधान करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर बालाकोट एअर स्ट्राईकबद्दलही दोघांमध्ये संवाद झालेला आहे. या संवादाबद्दल पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करून भाष्य केलं आहे.

Video : अर्णब व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरण… राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ पुन्हा व्हायरल

“२०१९मध्ये मी संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत बोलताना भारतातील फॅसिस्ट मोदी सरकारनं देशातील निवडणुकीसाठी बालाकोट संकटाचा वापर केला. एका भारतीय पत्रकाराच्या संवादातून हा नवीन खुलासा झाला आहे. हे पत्रकार त्यांच्या तापटपणामुळे ओळखले जातात. या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून मोदी सरकार आणि भारतीय माध्यमांमध्ये असलेले चुकीच्या संबंधाचाही खुलासा झाला आहे. ज्यातून हेच दिसत आहे की, संपूर्ण खंडात अस्थिरता निर्माण होण्याच्या परिणामतेकडे दुर्लक्ष करून निवडणूक जिंकण्यासाठी हे धोकादायक लष्करी धाडस केलं केलं. पाकिस्ताननं बालाकोट संकट जबाबदारीनं टाळलं. तरीही मोदी सरकार भारताचं रुपांतर वाईट देशामध्ये करत आहे,” असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- अर्णबच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करा – काँग्रेसची मागणी

“पाकिस्तानातील दहशतवादामागे भारतीय प्रायोजकत्व, भारतव्याप्त जम्मू काश्मीर आणि आमच्याविषयी १५ वर्षापासून चुकीची माहिती पसरवणारी मोहीम या चॅटमुळे उघडकीस आली आहे. आता भारतातील माध्यमांनी आपले संबंध उघड केले आहेत, जे आण्विक क्षेत्राला संघर्षाच्या टोकाकडे ढकलत आहेत,” असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- अर्णब गोस्वामींचं कोर्ट मार्शल करणार का? संजय राऊत यांचा सवाल

“मी पुन्हा एकदा हे सांगतो की, माझं सरकार पाकिस्तान आणि मोदी सरकारच्या फॅसिस्टवादाविरुद्ध युद्धजन्य डाव उघडे पाडत राहिलं. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला बेजबाबदार आणि लष्करी अजेंड्यापासून थांबवायला हवा. कारण मोदी सरकार संपूर्ण खंडाला एका संघर्षामध्ये ढकलू शकते,” असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arnab goswami partho dasgupta whatsapp chat pakistan prime minister imran khan criticise bmh
First published on: 18-01-2021 at 11:34 IST