रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयात धक्का बसला आहे. अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक वृत्तवाहिनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मागणी फेटाळून लावत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
रिपब्लिक वृत्तवाहिनीविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांकडून विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रिपब्लिकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी पोलिसांकडून केली जात असून, याविरोधात गोस्वामी यांच्या रिपब्लिकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर सुनावणीसाठी आली होती. न्यायालयाने रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीलाही न्यायालयाने नकार दिला. याप्रकरणी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना स्थानिक न्यायालयात जाण्यास मूभा दिली आहे.
न्यायालय काय म्हणाले?
“ही याचिका महत्त्वाकांक्षी असल्याचं दिसत आहे. आपली इच्छा आहे की, महाराष्ट्र पोलिसांनी कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक करू नये. त्याचबरोबर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात यावं. यात हेच चांगले होईल की, आपण ही याचिका मागे घ्यावी,” असं न्यायालयानं सुनावलं. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतली.
[FULL STORY]
Supreme Court refuses to entertain plea by Arnab Goswami, Republic TV against Mumbai Police targeting the channelreport by @DebayanDictum#ArnabGoswami #republictv@republic @MumbaiPolice @DGPMaharashtrahttps://t.co/ZneiGpFNAN
— Bar & Bench (@barandbench) December 7, 2020
दाद मागण्यासाठी स्थानिक न्यायालयात जाण्याची परवानगी देत न्यायालयानं याचिका मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर गोस्वामी यांचे वकील मिलिंद साठे यांनी याचिका मागे घेतली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 7, 2020 2:27 pm