13 August 2020

News Flash

Lockdown : देशभरातून 13 लाख 54 हजार पेक्षाही अधिकजण उत्तर प्रदेशला परतले

देशभरातील स्थलांतरित मजुरांमध्ये उत्तर प्रदेश व बिहार या राज्यातील मजुरांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे

विशेष श्रमिक रेल्वेगाडीनं आपापल्या घरी जाणारे स्थलांतरित मजूर.(संग्रहित छायाचित्र)

लॉकडाउनमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी सुरू करण्यात आलेल्या श्रमिक स्पेशल ट्रेनद्वारे उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत जवळपास 13 लाख 54 हजार पेक्षाही अधिकजण परतले असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश अवस्थी यांनी दिली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात वाढू लागल्याचे पाहून, केंद्र सरकारकडून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. मात्र परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने लॉकडाउनचा कालावधी वाढतच गेला. परिणामी सर्व प्रकारच्या व्यवहारांसह उद्योगधंदे बंद झाल्याने, देशभरातील हातावर पोट असलेल्या स्थलांतरित मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. परिस्थिती इतक्यात काही सुधरणार नसल्याचे पाहून स्थलांतरितांनी सरकारकडून परवानगी मिळताच, मिळेल त्या मार्गाने आपल्या राज्यांची वाट धरली. या स्थलांतरितांना त्यांच्या राज्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सरकारकडून श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. याद्वारे लाखो स्थलांतरित मजुर आपल्या गावी परतले आहेत व अद्यापही परतत आहेत. देशभरातील स्थलांतरित मजुरांमध्ये उत्तर प्रदेश व बिहार या राज्यातील मजुरांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत जवळपास 13 लाख 54 हजार पेक्षाही अधिकजण 1 हजार 081 श्रमिक स्पेशल ट्रेनद्वारे विविध राज्यांमधून उत्तर प्रदेशमध्ये परतले असल्याची माहिती, उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव (गृह) अवनिश अवस्थी यांनी दिली आहे.

तसेच, उत्तर प्रदेशमध्ये सध्या उपचार सुरू असलेल्या करोनाबाधितांची एकूण संख्या 2 हजार 332 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 3 हजार 335 जण करोनामुक्त झाले असून, 152 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान,  देशभरात मागील चोवीस तासांत 6 हजार 654 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन, 137 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 25 हजार 101 वर पोहचली आहे. देशभरातील या तब्बल 1 लाख 25 हजार 101 करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेल्या 69 हजार 597 जणांचा व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 3 हजार 720 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यता आलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 4:42 pm

Web Title: around 1354000 people have returned to the state of uttar pradesh msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 विहिरीत आढळले नऊ मृतदेह; कोणालाच ठाऊक नाही नक्की घडलं काय?
2 चिंताजनक : ‘बीएसएफ’चे आणखी 21 जवान करोनाच्या विळख्यात
3 एक चूक झाली नी जगाला कळले डोनाल्ड ट्रम्प यांचे बॅंक डिटेल्स
Just Now!
X