News Flash

पश्चिम बंगाल : कांकिनारा परिसरातून ५० बॉम्ब जप्त

पोलिस आयुक्त अजय ठाकुर यांची माहिती

पश्चिम बंगालमधील भाटपारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कांकिनारा भागातून जवळपास ५० बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. मात्र सध्या येथीप परिस्थिती साधारण असल्याची माहिती उत्तर २४ परगनात बराकपूर विभाग-१ चे पोलिस आयुक्त अजय ठाकुर यांनी दिली.

लोकसभा निवडणुकांच्या अगोदरपासूनच भाटपारा परिसर कायम अशांत राहिलेला आहे. रविवारीच या ठिकाणी तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ लागू करण्यात आहे होते. पोलिसांकडू येथील परिस्थिती कायम शांत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर सद्य स्थितीबाबत बोलताना येथील भाजपा खासदार अर्जुन सिंह यांनी सांगितले होते की, राज्य आता लढाईच्या मानसिकतेत आहे. राज्यातून लवकरच ममतांना निरोप दिला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 4:02 pm

Web Title: around 50 bombs have been recovered from kakinara area under bhatpara msr 87
Next Stories
1 ‘विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिशा ‘राष्ट्रीय मिशा’ जाहीर करा’, काँग्रेसची लोकसभेत मागणी
2 डोंगराळ भागात AN-32 ची उड्डाणे सुरुच राहणार – एअर फोर्स प्रमुख
3 नक्षलींनी घडवून आणलेल्या स्फोटात जवान जखमी
Just Now!
X