News Flash

“अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी AK-47 घेऊन जाणारे मुंबई पोलीस भेकड”

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर साधला निशाणा

वरिष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामींना ताब्यात घेण्यासाठी AK-47 घेऊन जाणारे मुंबई पोलीस देशातील सर्वात भेकड पोलीस असल्याचं वादग्रस्त विधान आसामचे मंत्री हिमांता बिस्व शर्मा यांनी केलं आहे. गोस्वामी यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ठाकरे सरकारला निशाणा बनवलं आहे. त्यात हिमांता शर्मा यांनी देखील उडी घेतली आहे.

शर्मा म्हणाले, “मी ऐकलं होतं की मुंबई पोलीस कमिशनर हे कणखर अधिकारी आहेत. मात्र, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसाठी त्यांनी AK-47 घेऊन पोलीस पाठवले. याचाच अर्थ ते देशातील सर्व पोलिसांमध्ये भेकड पोलीस अधिकारी आहेत.” त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने अर्णब गोस्वामी यांना तात्काळ सोडायला हवं तसेच लोकांची माफीही मागावी. आसामचे लोक हे प्रकरण बारकईने पाहत असल्याचे शर्मा यावेळी म्हणले. मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीचा आवाज ऐकावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी जनतेचा विश्वास तोडला आहे. ते आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचीच बदनामी करीत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि देशाचीही बदनामी करीत आहेत, अशा शब्दांत त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 4:52 pm

Web Title: arrest arnab goswami he had to deploy cop with ak 47 that means he is the most coward officer in entire india says himanta biswa sarma aau 85
Next Stories
1 ‘आमची सुद्धा वकिलांची फौज तयार’ जो बायडेन यांचे ट्रम्प यांना प्रत्युत्तर
2 आघाडीवर असलेल्या जो बायडेन यांनी जिंकलेली राज्ये आणि इलेक्टोरल व्होटस
3 US Election Result: ‘या’ भारतीयाने सलग दुसऱ्यांदा जिंकली निवडणूक
Just Now!
X