News Flash

उन्नाव बलात्कार प्रकरण: भाजपा आमदार कुलदीप सेंगरला सीबीआयने केली अटक

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगरला अटक करा असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याला शुक्रवारी दिले.

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगरला सीबीआयने अटक केली आहे. सेंगरला अटक करा असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांना दिले होते.  कुलदीप सिंह सेगरला सीबीआयने ताब्यात घेतलं आहे पण अटक केलेली नाही असे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर मुख्य न्यायाधीश दिलीप बाबासाहेब भोसले आणि न्यायाधीश सुनीत कुमार यांच्या खंडपीठाने अटकेचे आदेश दिले.

उन्नाव बलात्कार प्रकरणाचा कायद्यानुसार अत्यंत कठोर तपास करा तसेच दुसऱ्या आरोपीला जो जामिन मिळालाय तो रद्द करण्यासाठी अर्ज करण्याचा विचार करा असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणातील पहिल्या एफआयआरमध्ये कुलदीप सिंह सेगरचे आरोपी म्हणून नाव नव्हते. कालच या प्रकरणी न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.

लखनऊमधून कुलदीप सेंगर यांना ताब्यात घेण्यात आलं. सीबीआयने पहाटे ४.३० वाजता कारवाई केली. सध्या सीबीयआने त्यांना कार्यालयात नेलं असून चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे गुरुवारीच सीबीआयकडे प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता, ज्यानंतर लगेच ही कारवाई करण्यात आली. विरोधक आणि संघटनांच्या दबावानंतर कुलदीप सेंगर यांच्यावर एफआयर दाखल करण्यात आला होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी मात्र एफआयआर दाखल केल्यानंतरही अटक करण्यास नकार दिला होता. मात्र सीबीआयकडे प्रकरण सोपवण्यात आल्यानंतर तपास वेगाने सुरु झाल्याचं दिसत आहे.

जून २०१७ मध्ये आमदार आणि त्यांच्या भावांनी बलात्कार केल्याचा पीडित तरुणीचा आरोप आहे. ८ एप्रिल रोजी प्रकरणाचा योग्य तपास केला जात नसल्याचा आरोप करत तरुणीन योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसदेखील आरोपींना मदत करत असल्याचा आरोप तिने केला. धक्कादायक म्हणजे रविवारी पीडित तरुणीच्या वडिलांना अटक करण्यात आली. सोमवारी पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. अहवालानुसार, पीडित पप्पू सिंग याना आमदारांच्या चार साथीदार आणि पोलिसांनी बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यानंतर कुलदीप सेंगर यांच्या भावाला अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 6:40 pm

Web Title: arrest bjp mla kuldeep singh sengar allahabad hc
Next Stories
1 कठुआ बलात्कार प्रकरण, मोदी मौन कधी सोडणार ? – राहुल गांधी
2 FB बुलेटीन: प्लास्टिकबंदी कायम, कच्चा लिंबूला राष्ट्रीय पुरस्कार व अन्य बातम्या
3 नियतीचा क्रूर खेळ! दोन मुलींच्या अपघाती मृत्यूनंतर गमावलं दत्तक घेतलेल्या मुलीलाही
Just Now!
X