हरिद्वार येथील पतंजली आयुर्वेद या कंपनीने तयार केलेल्या कोरोनिल या औषधाला आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणन योजनेनुसार प्रमाणपत्र बहाल केले. १९ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात घोषणा करण्यात आली. करोनावर पुराव्यानिशी सिद्ध झालेले कोरोनिल हे पहिले औषध असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कोरोनिलची निर्मिती पतंजली रीसर्च इन्स्टिटय़ूटने केली असून त्यांनी जानेवारी २०२० पासून या औषधावर काम सुरू केले होते. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात कोरोनिल औषध बाजारात आणण्यात आले. मात्र आता औषधाच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण आशियासंदर्भातील ट्विटर अकाऊंटवरुन जागतिक आरोग्य संघटनेने करोनासंदर्भातील कोणत्याही पारंपारिक औषधाला आम्ही परवानगी दिलेली नाही असं स्पष्ट केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नौऋत्य विभागाचे काम पाहणाऱ्या ट्विटर अकाऊंटवरुन ज्या दिवशी बाबा रामदेव यांच्या कोरोनिलला जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणन योजनेनुसार प्रमाणपत्र बहाल करण्यात आल्याचे सांगण्यात आलं त्याच दिवशी एक ट्विट करण्यात आळं होतं. “जागतिक आरोग्य संघटनेने पारंपारिक औषधांचा वापर करुन करोनावर उपचार करण्याच्या कोणत्याही पद्धतीची तपासणी केली नाही किंवा त्याला प्रमाणपत्रही दिलेलं नाही,” असं ट्विट करण्यात आलं आहे.

मात्र पतंजलीला कोरोनिलसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे आयुष मंत्रालयाकडून प्रमाणपत्र मिळाल्याचा दावा हे औषध बाजारात आणण्याची घोषणा करण्यात आलेल्या कार्यक्रमामधील बॅनरवर करण्यात आला होता. विशेष म्हणजे दोन केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते हे औषध आणि त्यासंदर्भातील संशोधनाचे अहवाल प्रकाशित करण्यात आले होते. मात्र आता जागितक आरोग्य संघटनेच्या या ट्विटच्या आधारे बाबा रामदेव यांनी फसवणूक केल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.

रामदेव काय म्हणाले?

स्वामी रामदेव यांनी या औषधासंदर्भात बोलताना, कोरोनिल हे सर्वानाच करोनाविरोधी उपायात प्रभावी असल्याचे दिसून येईल असं म्हटलं होतं. निसर्गोपचार पद्धतीचा वापर यात केला असून ते सर्वाना परवडणारे औषध आहे. आयुष मंत्रालयाने या औषधाची माहिती सादर केली असून कोरोनिल गोळ्या या कोविड १९ विषाणूला प्रतिबंध करतात, असा दावा रामदेव यांनी केला होता.

गडकरी म्हणाले…

औषध बाजारामध्ये आणण्यात आले त्या कार्यक्रमात उपस्थित असणारे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पतंजलीच्या संशोधनामुळे देशाला नक्कीच फायदा होईल, असे सांगत बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचे आभार मानले होते. ते वैज्ञानिक आधाराद्वारे पुन्हा लोकांसमोर आले आहेत, त्यामुळे औषधावरील लोकांचा विश्वास वाढेल, अशी खात्री गडकरी यांनी व्यक्त केली होती.

हर्ष वर्धन म्हणाले…

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी आयुर्वेदिक उपचार पद्धतींविषयी कौतुक केले होते. करोना काळात लोकांचा आयुर्वेदावरील विश्वास मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. करोनाच्या साथीपूर्वी आयुर्वेद संबंधीचा बाजाराची दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढ होत असे मात्र या काळात ५० ते ९० टक्क्यांनी वाढ झाली, असे सांगत हर्ष वर्धन यांनी भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकांचा आयुर्वेदावरील विश्वास वाढत असल्याचे सांगितले होते.

ट्विटरवर #ArrestRamdev हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. बाबा रामदेव यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात यावी अशी मागणी अनेकजण करत आहेत.

१) फोटोच अडचणीत आणणारा

२) लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हक्क नाही

३) लोकांच्या जीवाशी खेळणं

४) भारतीयांच्या जीवाशी खेळ

५) जागतिक आरोग्य संघटनेने तरी कारवाई करावी

६) ट्रेण्डमध्ये…

७) लज्जास्पद

८) दिल्ली पोलीस कारवाई करणार का?

९) आपण विचार तरी करु शकतो का

१०) त्यांना सूट का?

यापूर्वीही पतंजलीच्या करोना औषधावरुन वाद झाला आहे. यासंदर्भात बोलताना पतंजली कंपनीने म्हटले आहे, की त्यांनी २३ जूनला कोरोनिल हे औषध जारी केले होते त्या वेळी करोनाची साथ जोरात होती. त्या वेळी आयुष मंत्रालयाने या औषधाला केवळ आजाराची तीव्रता कमी करणारे औषध म्हटले होते. तर आता, आयुष मंत्रालयाने या औषधाचा उल्लेख हा करोनावरील इलाज ऐवजी करोना प्रतिबंधक औषध असा करावा असे सांगितले असल्याचे बाबा रामदेव यांनी १९ फेब्रुवारीच्या कार्यक्रमात म्हटले होते.