27 September 2020

News Flash

‘ईएमआय’वर फोन मिळवून देतो सांगत २,५०० जणांना गंडवणाऱ्याला अटक

आरोपीच्या साथीदारांचा शोध सुरू

बनावट वेबसाइट्सद्वारे ईएमआयवर मोबाइल फोन मिळवून देण्याच्या बहाण्याने एका ३२ वर्षीय व्यक्तीला २,५०० हून अधिक जणांना फसवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशतील गाझियाबादमध्ये ही घटना समोर आली आहे.

आरोपी जितेंद्रसिंह याने त्याच्या दोन साथीदारांसोबत ईएमआयवर मोबाईल फोन मिळवण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची माहिती पोलिसांना दिली.

दोन वर्षापासून आरोपी जितेंद्रसिंह याने आपल्या साथीदारांसोबत देशभरात २,५०० जणांची फसवणूक केली आहे. ९ सप्टेंबर रोजी इरफानने जितेंद्रविरोधात गोविंदपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. डिसेंबर २०१९ मध्ये इरफानने मोबाईल फोन घेण्यासाठी www.mobilityworld.in या वेबसाईटवर भेट दिली होती. या वेबसाईटवर ईएमआयवर आणि स्वस्त दरात मोबाईल फोन विकत असल्याची माहिती देण्यात आली होती.

वेबसाइटच्या माध्यमातून इरफानला paymobile@upi द्वारे काही रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यानंतर एका व्यक्तीने इरफानसोबत संपर्क साधत मोबाईल फोनसाठी आणखी पैसे जमा करण्यास सांगितले. पुन्हा इरफानने इरफानने paymobile@upच्या माध्यमातून आणखी काही रक्कम जमा केली. दरम्यान, फोन न मिळाल्याने इरफानने वेबसाईटशी संपर्क साधला पण कोणतेही उत्तर त्याला मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे कळताच इरफानने तक्रार दाखल केली.

१५ सप्टेंबर रोजी पोलिसांनी आरोपी जितेंद्रला गाझियाबाद येथील त्याच्या घरातून अटक करण्यात आली. या गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. जितेंद्रचे साथीदार अद्याप फरार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 1:50 pm

Web Title: arrested for cheating 2500 people by claiming to get a phone on emi abn 97
Next Stories
1 रशियन लशीचा डोस घेतल्यानंतर दर सातपैकी एका व्यक्तीवर साइड इफेक्ट
2 “मुंबईत वास्तव्य करण्याची संधी देऊन चूक केलीये का?,” प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेत संतप्त सवाल
3 चीन शेजारी देश असल्यानं आपण सावध राहायला हवं होतं; आझाद यांनी मोदी सरकारला सुनावलं
Just Now!
X