शहराच्या बाहेर असलेले ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ योगाभ्यास केंद्र आगीत खाक झाल्याची माहिती देत, या केंद्रास समाजकंटकांनी आग लावली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
बनी गाला भागातील ‘पीस स्ट्रीट’ येथे असलेल्या या केंद्रात शनिवारी सायंकाळी काही अज्ञात इसम पैशांची मागणी करीत घुसले आणि नंतर त्यांनी त्यास आग लावल्याचे पोलिसांनी सांगितले. या केंद्रात अवघे दोन रक्षक होते. सुमारे आठ जणांच्या जमावाने केंद्रातील पैशांची मागणी केली. हे पैसे कोठे आहेत, याची माहिती नसल्याचे रक्षकांनी सांगताच या जमावाने त्यांना बांधून ठेवत इमारतीस आग लावली. नंतर या गुन्हेगारांनी तेथून पलायन केले.
गुरू श्री श्रीरवीशंकर यांनी २०१२ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला असता त्यावेळी त्यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2014 2:28 am