20 January 2018

News Flash

मोदींच्या दुप्पट राहुल यांचे परदेश दौरे

यावर्षी पंतप्रधान २१ तर राहुल ४२ दिवस परदेशांत

संतोष कुलकर्णी, नवी दिल्ली | Updated: September 29, 2017 2:07 AM

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

जागतिक नेत्याची छबी बनविण्याचा हेतू; यावर्षी पंतप्रधान २१ तर राहुल ४२ दिवस परदेशांत

भिंगरी लावल्यासारखे परदेश दौरे म्हटले की बहुतेकांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींची छबी तरळते.. पण ही घट्ट झालेली प्रतिमा कदाचित चालू वर्षांमध्येतरी बदलायला लागेल. कारण काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना चक्क नुसतेच मागे टाकले नाही, तर त्यांच्यापेक्षा दुप्पट काळ परदेशात व्यतित केला आहे. मोदी २१ दिवस, तर राहुल हे त्यांच्या दुप्पट म्हणजे ४२ दिवस देशाबाहेर राहिले.

आणि महत्वाचे म्हणजे कदाचित राहुल यांच्या परदेश दौरयांच्या मालिकेची ही फक्त सुरूवात असू शकते. नुकत्याच झालेल्या अमेरिका दौरयात मिळालेल्या अनपेक्षित प्रतिसादानंतर त्यांनी रशिया व चीनच्या दौरयावर जाण्याचे ठरविले आहे. सुमारे दहा दिवसांचे हे दौर कदाचित गुजरात निवडणुकीच्या तोंडावर असू शकतात. यामागे मोदींच्या पावलावर पाऊल ठेऊन स्वत:चीही जागतिक छबी निर्माण करण्याचा त्यांचा हेतू असल्याचे समजते. भारतातील दूरसंचार एक शिल्पकार असणारे सॅम पित्रोदा यांच्यावर त्याची जबाबदारी सोपविल्याचे समजते.

या दोन्ही नेत्यांच्या जानेवारीपासूनच्या परदेश दौऱ्यांच्या तपशीलावरून निघालेला निष्कर्ष प्रतिमेचा तडा देणारा आहे. मोदींनी २१ दिवसांच्या सहा दौरयांमध्ये १२ देशांना भेटी दिल्या, तर राहुल यांनी ४२ दिवसांमध्ये केवळ चारच देशांचे दौरे केले. त्यापैकी नवे वर्ष साजरे करण्यासाठी जानेवारीच्या प्रारंभी केलेल्या युरोप दौरयाचा आणि आजीला भेटण्यासाठी इटलीला केलेल्या दौरयाचा कोणताही तपशील उपलब्ध नाही. याउलट नार्वे आणि नुकत्याच झालेल्या अमेरिका दौरयामध्ये अधिकृत गाठीभेठी, परिसंवाद, प्रश्नोत्तरे यांची रेलचेल होती.

पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर असताना नवे वर्ष साजरे करण्यासाठी लंडनसह युरोपला जाण्याची राहुल यांची कृती काँग्रेसमधील अनेकांना रूचली नव्हती. त्यातच पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असताना ते महत्वाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत चीनच्या दौऱ्यावर जाणार होते. पण पक्षांतर्गंत दबाबामुळे त्यांना तो दौरा रद्द करावा लागला

होता.  मध्यप्रदेशातील शेतकरी आंदोलन टिपेला असताना ते आजीला भेटण्यासाठी इटली गेले. सोळा दिवस तिथेच राहिले. वाढदिवसही तिथेच साजरा केला होता. पाटण्यामधील लालूप्रसाद यादव यांच्या महामेळाव्याला दांडी मारून त्यांनी नॉर्वेला जाणे पसंत केले होते. मात्र, अमेरिका दौरयामध्ये त्यांनी पाडलेल्या प्रभावाने पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मोदींच्या सुसाट परदेश दौऱ्यांसह काँग्रेससह विरोधकांनी बोचकारे काढले होते. अगदी ‘अनिवासी भारतीय पंतप्रधान’ (एनआरआय पीएम) अशी शेलकी, उपरोधिक टिप्पणी केली जायची. पण आता स्वत: राहुल यांनीच मोदींचा कित्ता गिरवायचा ठरविल्याचे दिसते आहे.

मोदींनी तीन वर्षांमध्ये (२६ मे २०१७पर्यंत) २७ दौरयांमध्ये ४४ देशांना भेटी दिल्या. त्यासाठी २७५ कोटींहून अधिक खर्च आला. १०५ दिवस ते देशाबाहेर होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दहा वर्षांमध्ये ७३ दौरे केले आणि ९६ देशांना भेटी दिल्या. त्यासाठी ७९५ कोटींहून अधिक खर्च आला होता.

First Published on September 29, 2017 2:05 am

Web Title: articles in marathi narendra modi vs rahul gandhi foreign trips
 1. A
  arun
  Sep 30, 2017 at 10:28 am
  दोन पंतप्रधान कामात तरी होते, रिकाम्या पक्षाच्या रिकाम्या नायकाला वेळ जायला दौरे करावे लागतात, हा फरक आहे.
  Reply
  1. R
   Rajesh
   Sep 29, 2017 at 5:19 pm
   RSS , भाजप चे छुपे समर्थक संतोष कुलकर्णी हि गोष्ट जाणीवपूर्वक विसरत आहेत कि मोदी यांचे दौरे हे सरकारी खर्चाने म्हणजे पर्यायी जनतेच्या टॅक्स वर आहेत तर राहुल गांधी यांचे दौरे हे त्यांच्या वयक्तिक खर्चाने आहेत , जनतेच्या खर्चाने नव्हे.....तसेच राहुल गांधी यांचे सर्व दौरे हे काही राजकीय नाहीत. बरेच दौरे हे कौटुंबिक आहेत .... त्यामुळे तुलना गैरलागू आहे....
   Reply
   1. A
    Ameya
    Sep 29, 2017 at 1:24 pm
    हा अजब न्याय आहे. मोदी पंतप्रधान या नात्याने परदेश दौरे करतात, त्यातून विदेशी गुंतवणूक होते, अनेक करार होतात त्याचा लोकांना त्रास होतो. आता यांचे पूजनीय गांधी स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी दौऱ्यावर जातात त्याचे हे नुसतं समर्थनच नाही तर कौतुक देखील करतात. लोकसत्ताने सरळ सरळ काँग्रेसची तळी उचलण्याची भूमिका घेतली आहे, १५० वर्षे इंग्रजांची गुलामगिरी करून झाली आता हे एका घराण्याची गुलामगिरी पत्करत आहेत.
    Reply
    1. Y
     Yogesh
     Sep 29, 2017 at 11:47 am
     rahul cha dupat maje pardesh davre aahet aamala kahi kaama nahit manun aami firtoy kahi chukiche aahe ka ?
     Reply
     1. K
      Kiran BG
      Sep 29, 2017 at 10:14 am
      Why Loksatta deleted my previous comments
      Reply
      1. K
       Kiran BG
       Sep 29, 2017 at 10:12 am
       Rahul Gandhi is a Pappu
       Reply
       1. K
        Kolhapurcha Wanga
        Sep 29, 2017 at 9:51 am
        RaGa che sagle daure ganja odhnyasathi, massage parlour madhye veshyanna bhetnya sathi hote.
        Reply
        1. V
         Veda
         Sep 29, 2017 at 9:36 am
         Modi is a Prime minister and his visits have a basis and some logic.As a minister, he has to travel around. When he was a CM, he traveled for his state responsibilities. Don't want to waste time in writing about the other person. Media is busy making him a Hero from a big Zero.
         Reply
         1. A
          Amol
          Sep 29, 2017 at 9:28 am
          हाहाहाहा, काय मूर्खपणा आहे राव, देशाच्या पंतप्रधानाने केलेल्या दौऱ्यांची तुलना तुम्ही वेकेशन वर गेलेल्या बालिश माणसाशी करताय. त्यात पण तो १६ दिवस आपल्या आजोळी राहायला गेलाय. आणि काय साध्य केलं हो त्याने. मूर्खांचा बाजार सगळा काहीतरी भान राखा.
          Reply
          1. K
           Kamlakar
           Sep 29, 2017 at 9:08 am
           राहुलजी. तुम्ही खूप लहान. आहेत. बुद्धीने. आणि वयानी तेव्हा शेळीने उंटांचा मुका. घेण्यास. जाऊ नये पडलं तर फसगत होईल तेव्हा. ज अपूणच
           Reply
           1. M
            Milind
            Sep 29, 2017 at 8:44 am
            राहूल गांधी स्वत:च्या पैशाने जातात तर मा. नरेंद्र मोदी टॅक्स पेयर च्या पैशाने जातात. मा. पंतप्रधानांसोबत मोठा लवाजमा असतो व त्याचाही खर्च टॅक्स पेयर च्या पैशातुनच केला जातो. असो. असले सडकछाप लेख लिहून काय मिळवतात कोण जाणे.
            Reply
            1. K
             Kiran BG
             Sep 29, 2017 at 8:31 am
             Modi goes for nation and Rahul for himself. he is using people's money for completion of his ambition but Indian people will not accept him. his image maid as Pappu he can't been accepted by Nation then forget about the world.
             Reply
             1. S
              Somnath
              Sep 29, 2017 at 8:11 am
              लाडक्या बाळाचे गुणगान ठीक आहे परंतु मोदींचे दौरे हे उत्सवी मौजमजेसाठी होते का? त्याची तुलना आजीला भेटावयास गेला आणि सोळा दिवस मजा करून आला त्याचाशी कशी कराल मग मोदींच्या सरकारी दौऱ्याविषयी एवढी कुजकट शेरेबाजी करणारे कुबेर आता लेखणी खरडण्यासाठी झोपेचे सोंग घेतील आणि पाळीव श्वान वाचकांच्या प्रतिक्रियेवर उपाशीपोटी तुटून पडतील.त्यांच्या वळचणीला पडलेल्या तुमच्यासारख्यानी स्वत:च अस्तित्व गहाण ठेवून कुलदीपकाशिवाय पर्याय नाही अशी समजूत करून त्याची छबी निर्माण करण्याचा तुमचा हेतू कधीच लपून राहिला नाही मग देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या सरकारी दौऱयाविषयी एक पत्रकार म्हणून किती हेटाळणी करावी तीही पत्रकारितेला न शोभणाऱ्या शब्दांच्या विशेषणांनी या मर्यादेचे भान सोडणार्यांना सजग वाचक चांगलेच समजून आहेत.
              Reply
              1. M
               mahesh
               Sep 29, 2017 at 7:56 am
               राहुल च्या बँकॉक दौऱ्या विषयी माहिती सांगा . किती संपर्क केला लोकांशी किती परिसंवाद साधले . शेलकी उपमा देण्यात लोकसत्ता चा वाटा मोठा आहे . का आत्ता राहुल ला दलित च्या घरी जाऊन जेवण घेऊन वोट नाही मिळालाय तर अनिवासी च्या घरात जेवायला गेले का ? अति शहाणे संपादक यांना अचानक साक्षत्कार झाला का? लोकसत्ता ने थुकी चाटून राजकारण करणाऱ्या राजनेत्यांना पाठी टाकायला काही कासार नाही सोडली !
               Reply
               1. A
                Ashutosh Joshi
                Sep 29, 2017 at 7:56 am
                यावरून पप्पूही आंतरराष्ट्रीय नेता असून नुसतेच " बोण्डले " चोकणारा ठोम्ब्या नाही असे स्पष्ट होते असे वाटते . " पप्पूचे " भले होवो हीच सदिच्छा .
                Reply
                1. उर्मिला.अशोक.शहा
                 Sep 29, 2017 at 6:35 am
                 वंदे मातरम- देशात असून सुद्धा मोदी दिल्लीहून आमदाबादला त्यांच्या मातोश्रीला भेटायला वर्षातून फक्त एकदाच येतात ते हि ज े तरच आणि राहुल गांधी कोणतेही निमित्त करून उठसुठ परदेश दौरे स हा ली करिता करीत असतात जा ग ते र हो
                 Reply
                 1. उर्मिला.अशोक.शहा
                  Sep 29, 2017 at 6:30 am
                  वंदे मातरम-वंदे मातरम- सुजाण मतदारांना सांगावे लागणार नाही कि बूंद से गाई वो हौद से नाही आती. मोदी चे दौरे सरकारी कामा करिता देशा ची सेवा करण्या करिता असतात बैलाचे दौरे हे देशाची बदनामी करण्या करिता असतात पाकिस्तानात जाऊन जनतेने निवडून दिलेल्या सरकार ला खाली खेचण्या साठी पाकिस्तान ची मदत मागण्या करिता लाचारी करण्या करीत केलेले असतात. मन मोहन सिंह आणि मोदी च्या दौऱ्याचा तपशील दिला बरे झाले पण दोघांच्या दौऱ्याचे यशापयश देखील मांडायला हवे होते ते तुम्ही कधी च मांडणार नाहीत राहुल गांधी नि मोदी ची किती हि नक्कल केली तरी कोळशाने काळी झालेली प्रतिमा स्वच्छा करता येणार नाही जा ग ते र हो
                  Reply
                  1. Vinayak Sohoni
                   Sep 29, 2017 at 5:52 am
                   भारताचे भावी पंतप्रधान होवू इच्छित असलेले राहुल गांधी ह्यांच्या परदेश वारी पाहून त्याना कोणते मतदार मतदान करतील?
                   Reply
                   1. राजाराम भारतीय
                    Sep 29, 2017 at 5:51 am
                    पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेश दौरे हे देशासाठी असतात आणि त्याचे फलित साध्य होत आहेच तर राहुल गांधींचे यांचे परदेश दौरे हे वैयक्तिक कारणांसाठी (भारतीय राजकारणातून पळ काढण्यासाठी असतात) हे देखील अनेकदा स्पष्ट झाले आहे.
                    Reply
                    1. Load More Comments